Raj Thackeray  SaamTvNews
महाराष्ट्र

फक्त प्रवक्तेच बोलतील, इतरांनी शहाणपणा करू नये; राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना खडसावले!

समाज माध्यमावर आपल्या भूमिका मांडताना हे उत्साही पदाधिकारी आणि मनसैनिक मनानेच काहीही प्रतिक्रिया देत असल्याची बाब राज ठाकरेंच्या निदर्शनास..!

Krushnarav Sathe

मुंबई : हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन नवीन राजकीय समीकरणांची चाचपणी करणारे महाराष्ट्र्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेऊन राज्याच्या राजकारणात धुरळा उडवून दिला. राज यांच्या भोंग्यांबाबतच्या भूमिकेवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे चित्र आहे. २ एप्रिलच्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी अयोध्या (Raj Thackeray Ayodhya Tour) दौऱ्याची घोषणा केली होती. तसेच या दौऱ्यासाठी मनसेकडून रेल्वेचे बुकिंग देखील करण्यात आले असून राज्यभरातील मनसैनिक राज ठाकरेंसह अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. (Raj Thackeray Latest News)

राज यांच्या या अयोध्या दौऱ्याबाबत राज्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना माध्यमांकडून विविध प्रश्न विचारले जात असताना या प्रश्नांना उत्तर देताना अथवा समाज माध्यमावर आपल्या भूमिका मांडताना हे उत्साही पदाधिकारी आणि मनसैनिक मनानेच काहीही प्रतिक्रिया देत असल्याची बाब पक्षाच्या लक्षात आल्यानंतर खुद्द राज ठाकरेंनी या अतिउत्साही कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱयांना जोरदार खडसावले आहे. राज ठाकरेंना समाज माध्यमाद्वारे पत्रक प्रसिद्ध करून या पदाधिकाऱयांना दौऱ्याबाबत काहीही न बोलण्याची ताकीद द्यायची वेळ आली आहे.

राज ठाकरेंनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले आहे कि, माझ्या अयोध्या दौऱ्याबाबत पक्षातील कुणीही प्रसार माध्यमांशी बोलू नये. पक्षाने प्रवक्ते नेमलेले आहेत. ते याबाबत बोलतील. इतर कोणीही बोलण्याचा शहाणपणा करू नये. तसेच इतर कोणत्याही विषयात पदाधिकारी अथवा कोणीही बोलू नये. ज्यांना जी जबाबदारी दिली आहे. त्यांनीही जबाबदारीने बोलावे. तसेच भाषेचे भान राखावे. जे लिहलंय ते पक्षातील सर्वांनी गांभीर्याने घ्यावे.

राज ठाकरेंनी पक्षातील पदाधिकाऱयांना पत्रक काढून समाज माध्यमाद्वारे सूचना दिल्या आहेत. तर, दुसरीकडे मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनीही अश्याच आशयाचे व पदाधिकाऱयांना जीभेवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना करण्याचे पत्रक काढले आहे.

या पत्रकात त्यांनी म्हटले आहे, पक्षाची अधिकृत भूमिका समाजमाध्यमांत मांडण्याचे काम पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि प्रवक्ते करत असतात. त्यामुळे पक्षाच्या राजकीय भूमिकांबाबत पक्षातील इतर कोणीही माध्यमांसमोर बोलू नये. पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांवर वा अन्य कोठेही टीकाटिप्पणी करताना भाषेचे भान बाळगावे, अशीही सूचना सरदेसाई यांनी पत्रात दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं 30000 रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील 18k- 22k आणि 24k चे दर

Mumbai Crime : मुंबई हादरली! १० वर्षाच्या मुलासमोर महिलेवर बलात्कार; गळ्यावर कोयता ठेवून तडीपार गुंडाचं भयंकर कृत्य

Ketan Agarwal Case: जीव घेणे सोपं झालं का? पुण्यातल केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर प्रसिद्ध अभिनेत्री संतापली

Nandurbar : हृदयद्रावक! इकडे बहिणीचा जन्म आणि दुसरीकडे भावाचा मृत्यू; माऊलीच्या आक्रोशाने सातपुडा सुन्न

Maharashtra News Live Update: भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक आमने-सामने, जोरदार घोषणाबाजी

SCROLL FOR NEXT