येवला : गवंडगाव येथील नारायणगिरी महाराज आश्रमातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. गोपालनंदन गुरुरामगीरी महाराज यांना १ लाख ४४ हजार रुपयांना गंडा (Money Fraud) घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बँकेच्या खात्याचे केवायसी अपडेट करण्यासाठी (Bank KYC) पासबुक, पॅनकार्ड, एटीएम कार्डची माहिती घेवून भामट्यांनी महाराजांची फसवणूक केलीय. बँक खात्याचे डिटेल घेऊन त्यांच्या खात्यातून पैसे लंपास करण्यात आले आहेत. याप्रकरणी गोपाल नंदन महाराजांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक अनिल भावारी अधिक तपास करत आहेत. (Online money fraud in narayangiri maharaj aashram)
मिळालेल्या माहितीनुसार, गोपालनंदन महाराजांनी सायबर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनंतर तालुका पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे. त्यांचे अंदरसुल येथील बँक ऑफ बडोदा शाखेत बँक खाते असून याच खात्यासाठी त्यांनी ऑनलाईन व्यवहारासाठी युपीआय,फोन पे,पेटीएमचा मोबाइल क्रमांक कार्यान्वित केलेला आहे. ४ सप्टेंबरला आश्रमात असताना त्यांच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून फोन आला.
त्यानंतर एका व्यक्तीने बॅक ऑफ बडोदाच्या हेड ऑफीस मुंबई येथून बोलत असल्याचे सांगितलं. बँक खात्याचे केवायसी अपडेट करा अन्यथा खाते कायमस्वरूपी बंद होईल, असं त्या व्यक्तीने महाराजांना सांगितलं.खाते चालु ठेवायचे असेल तर पासबुक, आधारकार्ड, पॅनकार्ड, एटीएम कार्डची माहिती द्यावी लागेल, असंही त्याने महाराजांना सांगितलं. बँक खाते बंद होईल या भीतीने महाराजांनी त्यांना माहीती दिली.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या खात्यातून युपीआय,ऑनलाईन व्यवहार झाला असल्याचे मेसेज आले. महाराजांना याबाबत कळताच त्यांनी झालेला प्रकार अंदरसूल येथे जावून बँकेत सांगितला. त्यानंतर त्यांना ऑनलाईन फसवणूक झाल्याचे समजले. या दोन दिवसांत त्यांच्या खात्यातून पेटीएम,कॅश फ्रि पेयु मनी,टोरासेस अशा ऑनलाईन युपीआय साईटवर वेगवेगळे ऑनलाईन व्यवहार झाले. यात १ लाख ४४ हजार ३९७ रुपयांचा ऑनलाईन अपहार झाला आहे.
Edited By - Naresh Shende
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.