'जॉन्सन अॅंड जॉन्सन' बेबी पावडर कंपनीचा उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द, FDA ची मोठी कारवाई

'जॉन्सन अॅंड जॉन्सन' बेबी पावडर कंपनीवर FDA ने मोठी कारवाई केली आहे.
Food and Drug Administration
Food and Drug Administrationsaam tv
Published On

मुंबई : प्रसिद्ध जॉन्सन अॅंड जॉन्सन बेबी पावडर बनवणाऱ्या कंपनीचा उत्पादन परवाना अन्न व औषध प्रशासन विभागाने रद्द केला आहे. मे जॉन्सन अँड जॉन्सन या बहुराष्ट्रीय कंपनीने उत्पादन केलेल्या 'जॉन्सन बेबी पावडर' या सौंदर्य प्रसाधनांचे नमुने प्रशासनाच्या नाशिक व पुणे येथील अन्न व औषध निरीक्षकांनी गुणवत्ता चाचणीसाठी घेतले होते. मात्र या पावडरच्या वापराने नवजात बालकाला त्वचेस हानीकारक असल्याने या कंपनीचा उत्पादनाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. (Johnson's baby powder company license cancelled permanently)

Food and Drug Administration
Breaking : ऑक्टोबरमध्ये PM नरेंद्र मोदी मुंबई-ठाणे दौऱ्यावर?

मिळालेल्या माहितीनुसार, नवजात बालकांसाठी जॉन्सन अॅंड जॉन्सन बेबी पावडरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पंरतु, या कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेत दोष असल्यामुळं सदर उत्पादनाचा सामू (PH) हा प्रमाणित मानकानुसार नाहीय. त्याच्या वापराने नवजात शिशू व लहान मुलांच्या त्वचेस अपाय होण्याची शक्यता आहे.

Food and Drug Administration
आदित्य ठाकरेंनी दिले नारायण राणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर; म्हणाले, 'काही लोकांवर...'

त्यामुळे अशाप्रकराचे उत्पादन सुरू ठेवणे हे बालकांच्या आरोग्यास धोकादायक ठरू शकते. त्यामुळे या संस्थेच्या मुलुंड, मुंबई या उत्पादन कारखान्याचा 'जॉन्सन अॅंड जॉन्सन' बेबी पावडर या उत्पादनाचा परवाना आजच्या आदेशान्वये कायम स्वरूपी रद्द करण्यात आला आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com