Onion Traders Issue saam Tv
महाराष्ट्र

Onion Traders Issue: नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांची आडमुठी भूमिका कायम, लिलाव बंदच

Onion Traders Issue: व्यापाऱ्यांच्या आडमुठ्या भूमिकेनंतर आता सरकारच्या भूमिकेकडे लक्ष

Bharat Jadhav

Onion Traders Issue:

कांदा व्यापाऱ्यांचा गेल्या सात दिवसांपासून बेमुदत संप सुरू आहे. कांदा व्यापारी आपल्या भूमिकेवर ठाम असल्यानं कांदा लिलाव बंद आहे. आपल्या मागणीसाठी नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी बैठकीत अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. (Latest News)

गेल्या सात ते आठ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी संपावर आहेत. त्यांच्या मागण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. परंतु त्यात कोणताच तोडगा निघाला नव्हता. या बैठकीत व्यापाऱ्यांनी लिलाव बंद करू नये अशी विनंती करण्यात आली होती. परंतु जिल्ह्यातील कांदा मार्केटमध्ये लिलाव बंद कायम होती. त्यावर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी कठोर भूमिका घेत कारवाई करण्याचा इशारा दिला होता.

कांदा व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे गेल्या सात दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद आहेत. कांदा व्यापाऱ्यांच्या या संपामुळे शेतकऱ्यांचा कांदा चाळीत पडला आहे. त्यामुळे तो सडण्याची शक्यता मंत्री दादा भुसे यांनी वर्तवली होती. नाशिक जिल्ह्यातील सर्व १५ बाजार समितीचे कांदा लिलाव ठप्प आहेत.

कांदा व्यापारी आपल्या मागणीवर ठाम असल्याने लिलाव बंद आहे. आपल्या मागणीसाठी नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी बैठकीत अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवलीय. यामुळे सरकार आता काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन, भाजपविरोधात आक्रमक

Blackhead Remover: नाकावर खूप ब्लॅकहेड्स झालेत? घरातल्या या सामग्रीने मिळेल क्लिन ग्लोईंग फेस

Maharashtra Nagar Parishad Live : भाजपा-शिवसेना कार्यकर्ते आमने-सामने

बिबट्यांच्या वाढत्या समस्यांवर मुख्यमंत्र्यांनी सांगितला अचूक उपाय, पाहा VIDEO

मतदानाच्या दिवशी मोठा राडा; रायगडमध्ये शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

SCROLL FOR NEXT