onion export ban effect rs 500 crore loss of onion growers farmers nashik Saam Tv
महाराष्ट्र

Onion Export Ban Impact: महिनाभरात ५०० कोटींचे नुकसान, शेतकरी व्यथित; कांदा निर्यातबंदी उठणार कधी?

अद्याप निर्यात बंदी उठविण्याबाबत ठाेस अशा काही हालचाली झाल्या नाहीत.

Siddharth Latkar

- अजय सोनवणे

Nashik News :

कांद्याच्या वाढत्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारन ७ डिसेंबरला निर्यात बंदीची घोषणा केली. या निर्णयाला एक महिना पुर्ण झाला. या निर्णायामुळे शेतक-यांचे माेठे आर्थिक नुकसान झाले आहे. महिनाभरात सुमारे ५०० कोटींचे शेतक-यांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. (Maharashtra News)

केंद्र सरकारने कांद्यावर 31 मार्च 2024 पर्यंत निर्यात बंदी लागू केली आहे. यामुळे राज्यातील विशेषत: नाशिक जिल्ह्यातील शेतक-यांचे आणि व्यापाऱ्यांचे माेठे आर्थिक नुकसान झाले आहे. हा निर्णय मागे घ्यावा यासाठी महिनाभरात राज्यातील विविध जिल्ह्यात कांदा लिलाव बेमुदत बंदची हाक देखील देण्यात आली.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कांदा प्रश्नाबाबत केंद्र सरकारकडे पाठपूरावा करीत आहाेत असे काही दिवसांपूर्वीच सांगितले. त्यानंतरही अद्याप निर्यात बंदी उठविण्याबाबत ठाेस अशा काही हालचाली झाल्या नाहीत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान निर्यात बंदी पुर्वी शेतक-याच्या कांद्याला ४००० रुपयांचा दर मिळत होता. तो निम्म्याने खाली आला आहे. या एक महिन्याच्या काळात सुमारे ५०० कोटींचे शेतक-यांचे नुकसान झाले आहे. केंद्राने तातडीने निर्यात बंदी उठवावी अशी मागणी ललित दरेकर (शेतकरी- संचालक बाजार समिती लासलगाव) यांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Sonu Nigam : 'ये दिल दीवाना...' रस्त्यावर थांबून छोट्या चाहत्यासोबत सोनू निगमनं गायलं गाणं, पाहा VIDEO

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

SCROLL FOR NEXT