Onion Saam Tv
महाराष्ट्र

कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव; निराश शेतकऱ्यानी उचललं टोकाचं पाऊल

कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणल आहे.

लक्ष्मण सोळुंके

अहमदनगर - कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव मिळाल्याने शेतकऱ्यानी (Farmer) बाजार समिती मध्येच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. भारत जाधव असं या शेतकऱ्याचं नाव असून 1 रुपये किलो प्रमाणे कांद्याची भाव बोली झाल्याने व्यापाऱ्या समोरच शेतकऱ्याने विष प्राशन केलं शेतकऱ्याला रुग्णालयात (Hospital) तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आल असून सध्या हा शेतकरी मृत्यूशी झुंज देत आहे.

हे देखील पाहा -

कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणल आहे. कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवाल दिल झाला असल्याचे पाहिला मिळत आहे. श्रीरामपूर तालुक्यातील भारत जाधव या शेतकऱ्यानी रक्त आठवण पिकवलेला कांदा कवडीमोल ठरला.

जाधव या शेतकऱ्याने 25 क्विंटल कांदा श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान उपबाजार समितीमध्ये विक्रीसाठी नेला होता. 25 किंट्टोल कांद्याचे 1 रुपये भावाप्रमाणे अडीच हजार रुपये मिळत असल्याने वाहतुकीचा खर्च देखील निघत नसल्याने शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले आणि बाजार समिती मध्ये व्यापाऱ्या समोरच विष प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवण्याचा प्रयत्न केला.

घटनेची माहिती जवळच्या शेतकऱ्यांच्या लक्षात येताच विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याला तातडीने श्रीरामपूर साखर कामगार रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल आहे. सध्या हा शेतकरी मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेमुळे श्रीरामपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

10 हजार देतो, तुझ्या मुलीला पाठव… लॉकअपमधील आरोपी महिलेकडे पोलीसाची घाणेरडी मागणी; ASI थेट तुरुंगात

South Indian Sambar Recipe: अस्सल साऊथ इंडियन स्टाईल सांबार आता बनवा घरीच, ही आहे सोपी रेसिपी

Pune Rain: पुण्यात अवकाळीचा पहिला बळी, अंगावर झाड कोसळून महिलेचा मृत्यू; ३ तासांपासून पावसाचा कहर सुरू, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : धुळे शहरात सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर, पटेल-तटकरेंची अनुपस्थिती? पडद्यामागे काय घडतंय?

SCROLL FOR NEXT