solapur, accident news, akkalkot saam tv
महाराष्ट्र

Akkalkot : देवदर्शनाहून परतताना भाविकांच्या बसला अपघात; एक ठार, सहा जखमी

पुढील तपास वळसंग पोलीस करत आहेत.

विश्वभूषण लिमये

Solapur Akkalkot Highway Accident News : स्वामी समर्थ यांचे दर्शन घेऊन साेलापूरला निघालेल्या भाविकांच्या बसला झालेल्या अपघातात (accident) एक जण ठार तर सहा जण जखमी झाले आहेत. आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती पाेलिसांनी (police) दिली.

सोलापूर - अक्कलकोट महामार्गावरील लिंबीचिंचोळी गावाच्या परिसरात पहाटेच्या सुमारास कर्नाटक राज्यातील खासगी बस उलटून झालेल्या अपघातात एक ठार तर सहा प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अक्कलकोट मधील श्री स्वामी समर्थ्यांचे दर्शन घेऊन हे भाविक सोलापूरकडे परतत असताना हा अपघात झाला आहे.

चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. बसमधील जखमींना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पुढील तपास वळसंग पोलीस करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT