Pandharpur, Maghi Yatra, Devotees Saam Tv
महाराष्ट्र

Pandharpur Maghi Yatra : विठुनामाच्या जयघोषांनी पंढरी दुमदुमली; माघी यात्रे निमित्त लाखाे भाविक दर्शन रांगेत

पाेलिसांची यंत्रणा यात्रे निमित्त सज्ज.

भारत नागणे

Pandharpur Maghi Yatra : माघ शुद्ध एकादशी उद्या (एक फेब्रुवारी) आहे. उद्या पंढरपूरात (pandharpur) माघी यात्रेस प्रारंभ हाेत आहे. या निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी सुमारे एक लाख भाविक दर्शन‌ रांगेत उभे आहेत. दरम्यान भाविकांच्या (devotees) सुरक्षेसाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.

माघी यात्रेसाठी पंढरपुरात भाविकांची गर्दी‌ वाढू लागली आहे. विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरा (VITTHAL RUKMINI MANDIR) पासून दीड किलोमीटर अंतरापर्यंत गेली आहे. दर्शन रांगेत सुमारे एक लाख भाविक आहेत. दर्शनासाठी आठ ते दहा तासांचा अवधी लागत आहे.

उद्या माघी एकादशीच्या निमित्ताने मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते पहाटे विठ्ठलाची महापूजा केली जाणार आहे. दर्शन‌रांगेतील भाविकांना मंदिर समितीच्या वतीने चहा,पाणी आणि नाष्टयाची सोय करण्यात आली आहे. विठुनामाच्या जयघोषांनी पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

Maharashtra Politics : शिवतीर्थावर ठाकरे बंधूंची भेट;महापालिकेची रणनिती ठरली? VIDEO

Astrology: 'या'५ राशींवर होणार धनवर्षाव, द्विद्वाद योगामुळे होतील मोठे फायदे

SCROLL FOR NEXT