Hindu Hrudaysamrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg,  saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident News : समृद्धी महामार्गावर दुसरबीड नजीक चालकाला डुलकी लागली अन्...

Hindu Hrudaysamrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg : पाेलिसांनी महामार्गावरील वाहतुक सुरळीत केला.

संजय जाधव

Samruddhi Mahamarg Accident News : समृद्धी मार्गावर भरधाव जाणारी माल वाहतुकीचा ट्रक दुभाजकावर आदळला. चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे अशी माहिती घटनास्थळावरुन मिळाली. (Maharashtra News)

हा अपघात समृद्धी महामार्गावर दुसरबीड जवळ घडला. अपघातग्रस्त ट्रक दिलीप श्यामा पवार रा. डांगी वाडा छिंदवाडा (मध्य प्रदेश) हे चालवत हाेते. हा ट्रक नागपूरवरून छत्रपती संभाजीनगर येथे जात होता. दरम्यान, समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडोर चॅलन नंबर ३२७.०९ वर दिलीप पवार यास डुलकी लागल्याने त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले.

त्यामुळे ट्रक डिव्हायडरच्या मधोमध असलेल्या पुलाच्या कठड्यावर धडकला. या अपघातानंतर ट्रक रस्त्याच्या बाजूला उलटला. यामध्ये चालक दिलीप श्यामा पवार हा गंभीर जखमी झाला तर क्लीनर शिवम सूर्यवंशी हा किरकोळ जखमी झाला अशी माहिती पाेलिसांनी दिली.

या अपघातानंतर जखमी चालकास रुग्णवाहिकेने बिबी येथील ग्रामीण रुग्णाल्यात नेण्यात आले. किनगावराजा पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळावर धाव घेतली तसेच वाहतूक सुरळीत केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar Constable Death Case: पत्नीनं पोलीस नवऱ्याचा घेतला जीव? पोलीस कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनं पालघरमध्ये खळबळ

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! कृषी योजनांचा लाभ मिळवायचाय? ई-केवायसी अन् फार्मर आयडी आहे गरजेचं

Weather Update: सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणार धुव्वाधार पाऊस; १६ राज्यांसाठी पावसाचा अलर्ट

तुमच्या सौंदर्यावर पाकचा क्रिम 'बॉम्ब', आरोग्याला घातक उत्पादनांची महाराष्ट्रात घुसखोरी

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणामागे मोदींचा डाव? डिलिमिटेशनसाठी नेमकं काय घडतंय?

SCROLL FOR NEXT