Pandharinath Pare and  kalpesh gaikwad
Pandharinath Pare and kalpesh gaikwad saam tv
महाराष्ट्र

जिवलग मित्राने केली आत्महत्या! दु:ख सहन न झाल्याने दुसऱ्याच दिवशी तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

साम टिव्ही ब्युरो

औरंगाबाद : प्रेमीयुगुल एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडतात. पण काही कारणास्तव त्यांच्यात दुरावा झाल्यावर प्रेमीयुगुलांनी एकमेकांसाठी जीवन संपवल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. परंतु, औरंगाबादमध्ये (Aurangabad) काहीस वेगळं घडलं आहे. एका तरुणाने विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केली. पंढरीनाथ रघुनाथ पारे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. पण आपला जिवलग मित्र पंढरीनाथ आपल्याला सोडून कायमचा निघून गेल्याचे कळताच त्याच्या (Two friends death) मित्रावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यानंतर पंढरीचा मित्र कल्पेशनेही विषारी द्रव्य घेऊन स्वत:ला संपवलं. कल्पेश राजू गायकवाड असं पंढरीनाथच्या मित्राचं नाव आहे. या घटनेमुळं मांजरी गाव शोकसागरात बुडाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिवलग मित्राने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याचे दुःख सहन न झाल्याने दुसऱ्याच दिवशी तरुणाने देखील आत्महत्या करुन जीवन संपवलं. ही दुर्देवी घटना औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील मांजरी येथे घडली आहे. कल्पेश राजू गायकवाड असे या तरुणाचे नाव आहे. मांजरी येथील पंढरीनाथ रघुनाथ पारे याने मंगळवारी नैराश्यातून आत्महत्या केली. त्यानंतर पंढरीनाथचा जिवलग मित्र कल्पेश खुप दुःखी झाला. मित्र सोडून गेल्याचे दुःख त्याला सहन झाले नाही आणि त्यानेही विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Numerology: 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांकडून नका ठेवू निष्ठा आणि विश्वासाची अपेक्षा; काय म्हणतं अंकशास्त्र?

Apple IPad Air आणि IPad Pro भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

BCCI शी चर्चा! नको रे बाबा; कारवाईनंतर केकेआरचा गोलंदाज राणाची क्रिकेट बोर्डावर टीका

Unseasonal rain : चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; चंद्रपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पूल गेला वाहून

EVM बिघाड, राडा, तुंबळ हाणामारी, व्हिडिओ आणि आरोपांच्या फैरी; तिसऱ्या टप्प्यात कुठं काय घडलं?

SCROLL FOR NEXT