Jayant Patil Latest Marathi news, Raj Thackeray Aurangabad Sabha, Jayanat Patil On Raj Thackeray  Saam TV
महाराष्ट्र

एकच क्लिप एकच भाषण, राज ठाकरेंवर दबाव असावा - जयंत पाटील

त्यांना अडचणीत आणण्याचे तुम्ही काहीच बोलत नाही, स्क्रिप्ट लिहून दिली आहे.

विजय पाटील

सांगली : राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडे दुर्लक्ष करणार असून राष्ट्रवादीवर बोलल्याशिवाय ठाकरे यांचे भाषण टीव्हीवाले दाखवतील का? तसंच शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर बोलल्याशिवाय कव्हरेज मिळत नाही. तसंच राज ठाकरेंचे भाषण केवळ एंटरटेनमेंट साठी असून त्यांच्या या भाषणाला महाराष्ट्र किंमत देईल असे वाटत नाही अशी टीका राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली ते सांगलीच्या इस्लामपूरमध्ये बोलत होते. (Jayant Patil latest Marathi news)

यावेळी पाटील म्हणाले महाराष्ट्रात हिंदू आणि मुस्लिम देखील हुशार झालेत आणि हे सगळं मतांच्या राजकारणासाठी चालले आहे. हे जनतेला सगळं कळतंय. मुस्लिम आणि हिंदूंच्या विकासाचे यांना काही देणेघेणे नाही. हे देखील त्यांच्या लक्षात आलं आहे. पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel) किती वाढले राज साहेब याच्यावर तुम्ही बोला. यावर तुम्ही बोलत नाही. त्यांना अडचणीत आणण्याचे तुम्ही काहीच बोलत नाही. त्यांना स्क्रिप्ट लिहून दिली आहे. त्यावर ते बोलत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला.

हे देखील पाहा -

राज ठाकरे कुठेतरी भाषण करतात त्याला फारसे महत्त्व नाही. तसेच चार तारखेला हनुमान चालीसाबाबत (Hanuman Chalisa) विचारल्यानंतर ते राज ठाकरे यांनाच विचारावं. राज ठाकरे यांनी आज वेगळे काही असे भाषण केले आहे. असे मला वाटत नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार साहेबांनी त्यांच्या मुलाखतीत घेतले आहे. सारखी तीच क्लिप फिरवायची भाषण तेच करायचं त्यामुळे त्यांच्यावर दबाव असावा असे मला वाटतं असही पाटील म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT