धक्कादायक! Omicron बाधितांमध्ये 2 वर्षांच्या मुलाचा समावेश, उस्मानाबादमध्ये पिता-पुत्र पॉझिटिव्ह SaamTV
महाराष्ट्र

धक्कादायक! Omicron बाधितांमध्ये 2 वर्षांच्या मुलाचा समावेश, उस्मानाबादमध्ये पिता-पुत्र पॉझिटिव्ह

ओमायक्रॉन या व्हेरिएंटने राज्याची चांगलीच चिंता वाढवली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी

उस्मानाबाद : कोरोना व्हायरसचा (corona virus) ओमायक्रॉन (Omicron) या व्हेरिएंटने राज्याची चांगलीच चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) या व्हेरिएंटचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चाले आहेत. परत एकदा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये (Osmanabad) ओमायक्रॉनचे २ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यात आता तब्बल २३ नवे ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हे देखील पहा-

विशेष म्हणजे २२ डिसेंबर या व्हेरिएंटचा महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) एकही रुग्ण आढळला नव्हता. उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यामध्ये ओमायक्रॉनच्या (Omicron) ५ रुग्णांपैकी १ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामधील कळंब (Kalamb) तालुक्यातील मोहा (Moha) येथे ओमायक्रॉनचे आणखी २ रुग्ण आढळून आले आहेत.

त्यामुळे जिल्ह्यामध्ये आता ओमायक्रॉनचे ५ रुग्ण झाले आहेत. मोहा येथील ३१ वर्षीय पिता आणि त्यांच्या २ वर्षीय मुलाचा ओमायक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह (Positive) आला आहे. मोहा येथील व्यक्ती घाना देशातून आली होती. त्यांना आणि त्यांच्या २ वर्षीय मुलाला या अगोदर कोरोनाची (Corona) लागण झाली होती. राज्यामध्ये काल तब्बल २३ नवे ओमायक्रोनबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

काल आढळलेल्या २३ रुग्णांमध्ये पुण्यातील (Pune) रुग्णांची संख्या जास्त आहे. पुण्यामध्ये तब्बल १३ नवे ओमायक्रोनबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये पुणे ग्रामीण आणि मनपा हद्दीमध्ये प्रत्येकी ३ आणि पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) ७ नव्या रुग्णांचा समावेश आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT