Ulhasnagar Oil Theft Racket Saam Tv
महाराष्ट्र

Ulhasnagar Oil Theft Racket: टँकर चालकांकडूनच ऑईलची चोरी, 7 जणांना बेड्या

ऑईल टँकर्समधून ऑईलची चोरी करुन अपहार करणाऱ्या एका टोळीचा ठाणे खंडणीविरोधी पथकाने पर्दाफाश केलाय.

अजय दुधाणे

उल्हासनगर: ऑईल टँकर्समधून ऑईलची चोरी करुन अपहार करणाऱ्या एका टोळीचा ठाणे खंडणीविरोधी पथकाने पर्दाफाश केलाय. याप्रकरणी एका ढाब्याच्या मालकासह टँकरवर काम करणाऱ्या एकूण 7 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत (Oil theft from oil tanker drivers 7 arrested from Ulhasnagar by Thane Anti-Ransom Squad).

मुंबईच्या ऑईल स्टोरेजमधून कच्चे ऑईल (Oil) टँकरमध्ये भरुन अंबरनाथ एमआयडीसीतल्या व्हॉल्व्होलाईन कंपनीत आणलं जात होतं. तिथे या ऑईलवर प्रक्रिया करुन त्यापासून ल्युब्रिकंट ऑईल तयार केलं जायचं. हे ऑईल ज्या टँकर्समधून अंबरनाथला आणलं जात होतं. त्या टँकर्सच्या चालकांनी ऑईल चोरी (Oil Theft) करण्याचं रॅकेट सुरु केलं होतं.

असे करायचे ऑईल चोरी

उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खोणी तळोजा महामार्गावर विसावा ढाबा आहे. या ढाब्यावर हे टँकरचालक रात्रीच्या वेळी थांबायचे. तिथे टँकरचं सील तोडून प्रत्येक टँकरमधून 50 ते 60 लिटर ऑईल काढून घेतलं जायचं. हे ऑईल विसावा ढाब्याच्या मागे असलेल्या एका मोठ्या टाकीत साठवलं जात होतं आणि नंतर त्याची विक्री केली जात होती.

या सगळ्याची माहिती मिळताच ठाणे खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक संजय शिंदे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या नेतृत्त्वाखाली रात्री सुमारास पोलिसांनी या ढाब्यावर धाड (Raid) टाकली. यावेळी तिथे ऑईलची चोरी सुरू असल्याचं उघड झालं. त्यामुळं पोलिसांनी शिवबुरन वर्मा, अमन सरोजा, संजय सिंग, प्रयाग सिंग, अमर वर्मा, संदीप वर्मा या टँकरवर काम करणाऱ्या 7 जणांना बेड्या ठोकल्या.

हे सगळे शिवडी कोळसा बंदर परिसरात राहणारे असून मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत. तर त्यांच्या या चोरीत मलंगगड परिसरात राहणारा विसावा ढाब्याचा मालक अनिल चंद्रकांत चिकणकर याचा सुद्धा सहभाग आढळून आल्याने त्यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मुंबईहून निघालेले हे ऑईलचे टँकर अंबरनाथ एमआयडीसीतल्या व्हॉल्व्होलाईन कंपनीत येत होते. सर्वसाधारणपणे बाहेरून आलेल्या टँकर्सचं कंपनीत आल्यानंतर वजन केलं जातं. मात्र, वाटेत ऑईल चोरी केल्यानंतर कंपनीत आलेल्या या टँकर्सचं वजन केलं जात नव्हतं का? असा प्रश्न यानंतर उपस्थित झाला आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मी ठरवलं तर डायरेक्ट कार्यक्रम करतो; भुजबळांच्या बालेकिल्ल्यातच मनोज जरांगेंनी डागली तोफ

Nikki Tamboli: 'बाई काय हा प्रकार' निक्कीनं केलं मार्केट जाम, Bold फोटो व्हायरल

VIDEO : वंचित आघाडी नक्की कोणसोबत? प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य | Marathi News

Hina Khan: कॅन्सरशी झुंजणारी अभिनेत्री हिना खानवर आणखी एक संकट; मालदीवला सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली अन्...

Rohit Sharma: रोहित शर्मा दुसऱ्यांदा झाला बाप! ज्युनियर हिटमॅनच्या आगमनानंतर रोहितची खास पोस्ट

SCROLL FOR NEXT