Laxman Hake On Jarange Saam Digital
महाराष्ट्र

Laxman Hake : 'शंभर खोक्यांचा अपहार, बंद दाराआड चर्चा..' लक्ष्मण हाकेंचे मनोज जरांगेंवर गंभीर आरोप; ED चौकशीची मागणी

Laxman Hake OBC Reservation Protest: मुख्यमंत्री तुम्ही म्हणता ओबीसी आरक्षण धक्का लागत नाही जरांगे म्हणतात आम्ही आरक्षण घेतलंय, नक्की कोण खरं बोलत आहे," असा सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला.

Gangappa Pujari

अक्षय शिंदे, जालना|ता. २१ सप्टेंबर

Laxman Hake Protest Jalna: राज्यामध्ये मराठा- ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापला आहे. एकीकडे ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील अंतरवाली येथे उपोषणाला बसले असतानाच या मागणीला विरोध करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही उपोषण सुरु केले आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यामध्ये वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता मनोज जरांगेंची ईडी चौकशी करा, असे म्हणत लक्ष्मण हाके यांनी जरांगेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

लक्ष्मण हाकेंचा जरांगेंवर निशाणा...

"मुख्यमंत्र्यांच्या तोंडी ओबीसींची भाषा कधी येत नाही, ओबीसींच्या प्रश्नावर आम्ही वास्तव प्रश्न विचारले होते. मुख्यमंत्र्यांना धनगरांच्या एसटी आरक्षणाबद्दल जीआर काढण्याचा अधिकार नाही, हा अधिकार संसदेचा आहे. मुख्यमंत्री घटनेशी द्रोह करत आहेत. मुख्यमंत्री तुम्ही म्हणता ओबीसी आरक्षण धक्का लागत नाही जरांगे म्हणतात आम्ही आरक्षण घेतलंय, नक्की कोण खरं बोलत आहे," असा सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला.

"उद्धव ठाकरेंसह जे आमच्या आरक्षणाबद्दल बोलले नाहीत, त्यांना आम्ही बॉयकॉट करणार आहोत. ओबीसी फक्त ओबीसींना मतदान करणार आहेत. जरांगे यांना रात्री पवार फॅमिली येऊन भेटते. ज्या देवेंद्र फडणवीस सारख्या माणसाने सारथीला निधी निर्माण करून दिला ते सगळी माणस आज देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने शिव्या घालतात. ओबीसींच्या बाजूने भूमिका न घेणाऱ्यांच्या सोबत कधीही सामील होणार नाही, आम्ही या निवडणुकीत पाडणार आहे सुरवात घनसांवगी पासून करणार आहे," असं लक्ष्मण हाके म्हणाले.

ईडी चौकशीची मागणी..

"आंदोलनामधून दहशत माजवण्याचं काम आणि ओबीसीवर दबाव टाकण्याचा काम सुरू आहे. जरांगे यांनी अभ्यास करावा. रात्री येऊन जर मंत्री भेटत असतील तर त्यांच काम काय आहे रात्रीच खेळ चाले. रात्रीत काय चालतं बंद दाराआड? शंभर खोक्यांचा अपहार झाल्याच त्यांनी मान्य केला आहे, राज्य सरकारने चौकशी केली पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकारला विनंती आहे की जरांगे यांची ईडीमार्फत चौकशी झाली पाहिजे, असे म्हणत ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनीही जरांगेंवर गंभीर आरोप कले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT