Chhagan Bhujbal addressing OBC supporters as community rift emerges ahead of Beed mega rally on reservation. Saam Tv
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal: आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार, ओबीसींसाठी भुजबळांचा एल्गार

OBC Reservation Row Intensifies: पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा तापणार आहे.. कारण भुजबळांनी ओबीसींसाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय.. मात्र या आंदोलनात आता उभी फूट पडलीय.. ती नेमकी कशी? आणि भुजबळांनी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी कशी रणनीती आखलीय?

Bharat Mohalkar

मराठा आरक्षणासाठीच्या हैदराबाद गॅझेटियरविरोधात ओबीसी समाज आक्रमक झालाय.. लक्ष्मण हाकेंसह ओबीसी आंदोलकांनी वातावरण तापलंय...त्यातच आता मंत्री छगन भुजबळांनी थेट बीडमधून सरकारविरोधात एल्गार पुकारण्याचा निर्धार केलाय..

खरंतर मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू कऱण्याचा शासन निर्णय जारी केलाय..त्याला भुजबळांच्या समता परिषदेसह ओबीसी समाजाने हायकोर्टात आव्हान दिलंय...तर दुसरीकडे भुजबळांनी रस्त्यावरच्या लढाईला सुरुवात करत समता परिषदेच्या माध्यमातून बीडमध्ये एल्गार पुकारण्याचं जाहीर केलंय.. दरम्यान ओबीसी आरक्षण संपल्याच्या भीतीने आत्माराम भांगे या रिक्षाचालकाने आत्महत्या केलीय..त्यापार्श्वभुमीवर भुजबळांनी आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करण्याचा निर्धार केलाय...

एकीकडे समता परिषदेने महाएल्गार मेळावा आयोजित केलाय. दरम्यान मेळाव्याच्या बॅनरवर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचे फोटो वगळण्यात आलेत..

बॅनरवर फोटो नसल्यानं नाराज झालेल्या लक्ष्मण हाकेंनी थेट फेसबूक पोस्ट करत पाथर्डीतील दैत्यनांदूरच्या सभेनंतर ओबीसी आंदोलनातून बाहेर पडण्याचे संकेत दिलेत..

खरं तर 2023 मध्ये छगन भुजबळांनी जालन्याच्या सभेआधी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन एल्गार पुकारला होता.. आता पुन्हा आपल्या ते मंत्रिपदाचा राजीनामा देणार की मंत्रिमंडळात राहून ओबीसींसाठी एल्गार पुकारणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT