चंद्रशेखर बावनकुळे Saam TV
महाराष्ट्र

OBC Reservation: 'त्या' बोलघेवड्या OBC मंत्र्यांनी राजीनामा द्यावा - चंद्रशेखर बावनकुळे

जे बोलघेवडे मंत्री OBC समाजाचं नुकसान नाही, असं बोलत राहिले, म्हणत राहिले. त्या राज्य सरकारमधील ओबीसी मंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजासोबत बेइमानी केलीय, सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल टेस्ट पूर्ण करा आणि आरक्षण द्या; असं सांगितलं होतं. मात्र, महाविकास आघाडी सरकारने (MVA Goverment) ते केले असते तर आज ही वेळ आली नसती असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्गीय आयोगाचा अहवाल फेटाळल्यानंतर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला केला

ते म्हणाले, 'न्यायालयाने आज जो निकाल दिलेला, तो ओबीसी समाजासाठी दुर्दैवी आहे. ठाकरे सरकारने OBC समाजाशी बेईमानी केली आहे या सरकारने दिशाभूल करणारा अंतरिम अहवाल सादर केल्याने आज सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं असून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल दुर्देवी, आहे यामुळे ओबीसी समाजाचं मोठं नुकसान करणारा असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

दरम्यान जे बोलघेवडे मंत्री समाजाचं नुकसान नाही, असं बोलत राहिले, म्हणत राहिले. त्या राज्य सरकारमधील ओबीसी मंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी राजीनामा द्यावा, तसंच स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीमध्ये भाजपकडून ओबीसी समाजाचे उमेदवार दिले जाणार असल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhyang Snan Time: दिवाळी पहाटच्या दिवशी 'अभ्यंगस्नान' कधी करावे? वाचा शुभ मूहूर्त

Maharashtra Live News Update : पाळीव जर्मन शेफर्ड श्वानाने केलेल्या हल्ल्यात चिमुकला मुलगा गंभीर जखमी

Diwali 2025 : आली दिवाळी! फटाके फोडताना 'ही' घ्या काळजी, नाहीतर...

Priyadarshini Indalkar: चुनरी तेरी कमाल कर गई.... प्रियदर्शनी इंदुलकरचा हटके लूक

कसारा घाटात कामगारांचा बिऱ्हाड मोर्चा, मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईकडे मोर्चा वळवणार

SCROLL FOR NEXT