Laxman hake on Manoj Jarnge Saam TV
महाराष्ट्र

Jalna News : लाठ्या-काठ्यांचा काळ गेला, उगाच गावाची शांतता बिघडवू नका; लक्ष्मण हाके संतापले

Satish Daud

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या बीड जिल्ह्यातील मातोरी या गावात दगडफेक झाल्याची घटना समोर आली. डीजे वाजवण्याच्या वादातून ही दगडफेक झाल्याची प्राथामिक माहिती समोर आली. या घटनेमुळे गावात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या गावात तणापूर्ण शांतता असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी या दगडफेकीच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. मातोरी गावातील घटना अतिशय दुर्दैवी आहे, अशी खंत हाके यांनी व्यक्त केली आहे. गाड्या फोडून किंवा दहशत माजवून कुणी जर कायद्याला चॅलेंज करीत असतील तर अशा लोकांचा मी निषेध करतो. असंही हाके यांनी म्हटलंय.

आता लाठ्या-काठ्यांचा काळ गेला असून आपण बुद्धीने चाललं पाहिजे, असं आवाहन यावेळी लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आणि मराठा समाजातील तरुणांना केलं आहे. दगडफेकीच्या घटनेवर हाके म्हणाले, की मला इथे यायच्या अगोदर बातमी कळाली. एका गावात दगडफेक झाली, असं ऐकायला मिळालं. हे अठरापगड जातीचा बीड जिल्हा आहे.

या तरुणांचा उत्साह बघितला, ना की आठवण येते, कधीकाळी लाठ्या-काठ्यांची लढाई व्हायची, आज लढाई होतेय ती हिमती वरती, बॅलेटवरती होतेय, कलमाने होतेय, शिक्षणाने होतेय, फक्त आपलं डोकं शाबूत ठेवायचे, तुमचा कोण परका कोण ? हे ओळखायचे. असं म्हणत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मातोरी गावातील घटनेवर जाहीर भाषणातून प्रतिक्रिया दिली आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Video : 'ते महाविकास विरोधी लोकं'; मोदींचा घणाघात !

Hingoli Crime : हिंगोलीत फिल्मी स्टाईल थरार; कोट्यवधींच्या खंडणीसाठी वृद्धाचं अपहरण करणाऱ्या 6 जणांच्या आवळल्या मुसक्या

VIDEO : PM मोदींच्या भाषणाची सुरुवात मराठीतून, बघा काय म्हणाले?

PM Modi In Thane: मराठी, मेट्रो अन् मविआ; ठाण्यात PM मोदींची विरोधकांवर चौफेर टीका

Pune Devi Temple : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे जम्मूच्या वैष्णो देवी मंदिराची प्रतिकृती

SCROLL FOR NEXT