Ahmednagar News: Saamtv
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal: १६ नोव्हेंबरला मंत्रीपदाचा राजीनामा दिला पण... ओबीसी एल्गार मेळाव्यात छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

Ahmednagar News: "महाराष्ट्रामध्ये उन्माद केला जातोय ओबीसी लोकांना त्रास दिला जातोय. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही मात्र ते वेगळं द्या.." असे छगन भुजबळ यावेळी म्हणाले.

Gangappa Pujari

सुशील थोरात, अहमदनगर|ता. ३ फेब्रुवारी २०२४

OBC Elgar Melava Ahmednagar:

मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षण अध्यादेशानंतर पहिल्यांदाच ओबीसींचा महा एल्गार मेळावा आज अहमदनगरमध्ये पार पडत आहे. अहमदनगरच्या क्लेरा ब्रूस हायस्कूलच्या मैदानावर ही सभा होत आहे. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी आपण १६ नोव्हेंबरलाच मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचा मोठा गौप्यस्फोट केला आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ?

"भटक्या विमुक्त ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायविरुद्ध आवाज उठवण्यासाठी ही सभा होत आहे. अनेक वेळा आमची लायकी काय विचारले जाते. अनेक स्वातंत्रवीर होऊन गेले आहेत, ते आमचेच होते. २५ वर्ष विधानसभेला अनिल राठोड निवडून आले लढायला लागते रडून उपयोग नाही, असे म्हणत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंवर (Manoj jarange Patil) हल्लाबोल केला.

जरांगेवर निशाणा...

"आम्हाला आरक्षण मिळाले म्हणून गुलाल उधळला मग उपोषण कशाला करता. कागद आला आणि हा म्हणतो अध्यादेश आला. मसुदा आणि अध्यादेश यातला फरक कळत नाही. महाराष्ट्रामध्ये उन्माद केला जातोय ओबीसी लोकांना त्रास दिला जातोय. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही मात्र ते वेगळं द्या.." असेही छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यावेळी म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुख्यमंत्र्यांना सवाल...

"मुख्यमंत्र्यांचा (Eknath Shinde) अवमान करायचा नाही. मात्र प्रश्न करायचा आहे वाशीमध्ये तुम्ही जाहीर केलं मी शपथ घेतली होती ती मी पूर्ण केली. मग मला प्रश्न पडतोय की शपथ पूर्ण झाली तर आयोगाचा सर्वे कशाला? तपासणी करणारे लोक आपोआप माहिती भरतात. खोटं खोटं सुरू आहे. आरक्षण मिळाले तर हे कशासाठी? अनेक ठिकाणी खोटे कुणबी प्रमाणपत्र दिली जातात. तीनशे साठ कोटी रुपये खर्च या साठी करत आहात का?" असे अनेक सवाल उपस्थित करत छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

ओबीसी आरक्षण संपेल..

"ओबीसींचे सर्व आरक्षण संपवून टाकेल हे सर्वांच्या लक्षात येत नाही का? सुप्रीम कोर्टाचे अनेक निकाल आहेत ते आरक्षण विरोधात आहेत. झुंडशाहीने कोणी आरक्षण घेतले तर त्याला बाहेर काढले जाईल असे निवाडे आहेत. काय चाललय समजत नाही. ओबीसी मोर्चात सामील होतात म्हणून मारहाण केली जात आहे त्रास दिला जात आहे,"असे गंभीर आरोपही छगन भुजबळ यांनी केले.

१६ नोव्हेंबरला मंत्रीपदाचा राजीनामा दिला... 

सरकारमधील लोक विरोधी पक्षाचे नेते राजीनामा द्या सांगतात, तसे सरकारमधील लोकही मागतात. मला त्या सगळ्यांना सांगायचे आहे. १७ नोव्हेंबरला पहिली रॅली झाली. १६ नोव्हेंबरला राजीनामा दिला मग रॅलीला गेलो, असा गौप्यस्फोट करत ओबींसीसाठी शेवट पर्यंत लढणार आहे, असा निर्धारही भुजबळांनी व्यक्त केला.

(Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Health: व्यायाम करताना 'या' चुका टाळा, अन्यथा हृदयावर होतील होतील गंभीर परिणाम

Ladki Bahin Yojana: 'लाडकी'चा 4800 कोटींचा घोटाळा, कष्टकऱ्यांचे पैसे कुणाच्या खिश्यात?

Shocking : बॉयफ्रेंडशी भांडण, नैराश्यातून तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, गळफास घेण्याआधी इंस्टाग्रामवर शेअर केली शेवटची पोस्ट

Dada Bhuse: मालेगावात शिक्षक भरती घोटाळा,शासनाला 2 कोटी 69 लाखांचा गंडा

Shailesh Jejurikar : मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G ला 'भारतीय' नेतृत्व; मराठमोळे शैलेश जेजुरीकर कोण आहेत? VIDEO

SCROLL FOR NEXT