OBC Agitation Saam Tv
महाराष्ट्र

OBC Agitation: ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळाला मिळाली भेटीची वेळ; २९ सप्टेंबरला होणार राज्य सरकारसोबत बैठक

OBC Agitation: ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाला राज्य सरकारनं बैठकीसाठी निमंत्रण दिलंय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

OBC Agitation:

मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्यात यावे, यासाठी जालन्यात मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण आंदोलन केलं होतं. राज्य सरकारनं जरांगे पाटलांना आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण सोडलं. परंतु जरांगे पाटलांच्या मागणीला ओबीसी समाजानं विरोध केलाय. जरांगे पाटलांच्या मागण्यामुळे मराठा समाज आणि ओबीसी समाज आमने-सामने आले आहेत. मराठ्याना कुणबी दाखले देण्याच्या निर्णयाविरोधात नागपूरमध्ये ओबीसी समाजाने आंदोलन सुरू केले आहे. (Latest News )

या आंदोलनातील ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाला राज्य सरकारनं बैठकीसाठी निमंत्रण दिलंय. ओबीसी समाजाच्या ४५ जणांच्या शिष्टमंडळाला राज्य सरकारनं २९ सप्टेंबरला बैठकीसाठी बोलवलं आहे. ही बैठक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित होणार आहे. सरकारनं राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि सर्वशाखीय कुणबी नेत्यांना बैठकीला बोलवलंय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान बैठकीसाठी वेळ दिल्यानंतर ओबीसी समाजानं आंदोलन मागे घ्यावं, अशी विनंती केली जात आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघानं आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती भाजपचे ओबीसी नेते परिणय फुके यांनी मागणी केलीय. परिणय फुके हे बैठकीचे पत्र घेऊन आंदोलनस्थळी पोहचले आहेत. ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संविधान चौकात उपोषण आंदोलन सुरू आहे.

दरम्यान गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनस्थळी भेट दिली होती. सरकारनं रविवारपर्यंत चर्चेला बोलावले नाही तर सोमवारपासून अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशार राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heartbreaking News : देवीच्या दर्शनावेळी चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Attraction to toxic men: मुली टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये का अडकतात? 'ही' 6 मानसिक कारणं समजून घ्या

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT