बुलढाणा: देशाच्या आजच्या आर्थिक अडचणीला नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांचं मोहम्मद पैगंबरांबद्दलचं वक्तव्य कारणीभूत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड.प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे.
ते आज बुलढाण्यात (Buldhana) मातंग समाजाच्या मेळाव्यासाठी आले होते.यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आंबेडकर म्हणाले, देशाच्या आजच्या अडचणीत आलेल्या आर्थिक परिस्थितीला नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबरांबद्दल केलेलं विधान कारणीभूत असल्याचं सांगत भाजपा व RSS वर आरोप केला.
पाहा व्हिडीओ -
ते पुढे म्हणाले, नुपूर शर्मा यांनी केलेलं मोहम्मद पैगंबराच्या संदर्भातलं जे वक्तव्य आहे . आपण एक गोष्ट लक्षात घेतले पाहिजे की, मुस्लिम (Muslim) धर्म पाळणारा जगातला जो मुस्लिम आहे त्यांच्यावरती काही अत्याचार झाला तर मुस्लिम जगाला काही घेणेदेणं नाही, त्यांचा त्याच्याशी संबंध नाही.
मात्र, मोहम्मद पैगंबर यांना मानणाऱ्यांचा वर्ग जगाच्या अनेक देशांमध्ये आहे. त्यामुळे "तो " सेन्सिटिव्ह विषय आहे. आज जी आपली आर्थिक परिस्थिती जी अडचणीत चाललेली आहे त्याचं सर्वात मोठं कारण हे नुपूर शर्मा यांना BJP आणि आरएसएस'चे सरकार संरक्षण देत असून त्यांच्यावर काही कारवाई करत नाहीये त्याचा हा परिणाम असल्याचा आरोप देखील आंबेडकरांनी यावेळी केला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.