nsui protests at sant gadge baba amravati university demanding online exam saam tv
महाराष्ट्र

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात NSUI चे आंदाेलक पाेलीसांना भिडले; वातावरण तंग

राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची कन्या आकांक्षा आंदोलनात सहभागी.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने (sant gadge baba amravati university) ऑनलाइन पद्धतीने परीक्षा (exam) घ्याव्यात यासाठी आज (शुक्रवार) काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेने (NSUI) विद्यापीठ परिसरात राडा घातला. यावेळी विद्यार्थी (students) आंदाेलक आणि पाेलीसांची झटापट झाली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून मागण्या मान्य हाेईपर्यंत आंदाेलन छेडणार असा इशारा एनएसयुआयने (amravati) विद्यापीठ प्रशासनास दिला आहे. (sant gadge baba amravati university latest marathi news)

एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष आमिर शेख (amir shaikh) व पालकमंत्री यशोमती ठाकुर यांची कन्या आकांशा (akansha thakur) यांनी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी आंदाेलक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या विराेधात जोरदार घोषणाबाजी केली. कोरोना काळात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ६० टक्के अभ्यासक्रम हा ऑनलाइन पद्धतीने पूर्ण झाला. आता होणारी परीक्षा ऑफलाइन का? असा सवाल आंदाेलकांनी केला आहे.

यावेळी काहींनी विद्यापीठ परिसरात पत्रक फेकण्यास प्रारंभ केला. पोलिसांनी आंदाेलकांना मज्जाव करण्यास प्रारंभ केल्यानंतर काही आंदाेलक विद्यार्थी आक्रमक झाले. त्यांनी मागण्यांच्याबाबत जाेर जाेरात घाेषणा देत विद्यापीठ परिसर दणाणून साेडला. यावेळी पाेलीसांची आणि आंदाेलकांची झटापट देखील झाली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

गाणं लावण्यावरून वाद; शिंदेंच्या नेत्याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला, काळंनिळं होईपर्यंत मारलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

SCROLL FOR NEXT