now supply of mangoes will be by plastic crate instead of wooden packing Saam Digital
महाराष्ट्र

Konkan: आंब्याच्या लाकडी पेट्या होणार इतिहासजमा, प्लॅस्टिकच्या कॅरेटला बागायतदारांची पसंती; जाणून घ्या कारण

सुमारे पाच डझनाचे आंबे निळ्या किंवा अन्य रंगाच्या कॅरेट मधून एपीएमसी मार्केटमध्ये जातात. तिथे हे आंबे गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी ही आंब्याची रिकामी कॅरेट कोकणातील देवगडसह ज्या-ज्या भागातून पाठविले जातात. त्या ठिकाणी ती परत येते.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

कोकणातून मुंबईत जाणारा आपूस आंबा लाकडी पेट्या ऐवजी प्लॅस्टिकच्या कॅरेट मधून पाठवला जात आहे. यामुळे आगामी काळात लाकडी पेट्या इतिहास जमा हाेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंबा प्लास्टिक कॅरेट मधून जात असल्याने तो सुरक्षित जात असल्याचा दावा येथील शेतकरी करत आहेत. (Maharashtra News)

काेकणातील आंबा हा प्रसिद्ध आहे. आंब्याचे पेट्या मुंबईच्या एपीएमसी मार्केट मध्ये माेठ्या प्रमाणात काेकणातून जातात. या पेट्या लाकडी असतात. आता बदलत्या काळानूसार लाकडी पेट्यां ऐवजी आंबा प्लॅस्टिकच्या कॅरेट मधून मुंबईला जाऊ लागला आहे.

सुमारे पाच डझनाचे आंबे निळ्या किंवा अन्य रंगाच्या कॅरेट मधून एपीएमसी मार्केटमध्ये जातात. तिथे हे आंबे गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी ही आंब्याची रिकामी कॅरेट कोकणातील देवगडसह ज्या-ज्या भागातून पाठविले जातात. त्या ठिकाणी ती परत येते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आंबा प्लास्टिक कॅरेट मधून जात असल्याने तो सुरक्षित जात असल्याचा दावा येथील शेतकरी करत आहेत. त्यामुळे पेटींचा होणारा खर्च पण वाचतो आणि आंबा सुरक्षित जातो असा दावा शेतक-यांनी केला आहे. राजेश वाळके म्हणाले पाच डझनाची ही भरलेली प्लॅस्टिकची कॅरेट गाडीतून सुरक्षित जाते आणी सुरक्षित येते. यामुळे आंबा खराब होत नाही किंवा चिरडून जात नाही. तसेच लाकडी पेटी पेक्षा खर्चही कमी येतो.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation : अखेर मराठा समाजाला मोठा दिलासा, उच्च न्यायालयात नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update : नवी मुंबई विमानतळ अन् मुंबई मेट्रो-३ चे उद्घाटन

Soft Dhokla Tips: ढोकळा सॉफ्ट होत नाही, चपटा होतोय? मग ही ट्रिक करा फॉलो

Maharashtra Politics: शिवसेना कुणाची, शिंदे की ठाकरेंची? निकाल लागणार की पुन्हा तारीख पे तारीख? उद्या निकाल लागणार

प्रबोधनकार ठाकरेंचा विचार की हिंदू धर्माचा अपप्रचार; पुस्तकावरुन वादाची ठिणगी

SCROLL FOR NEXT