Nitesh rane Saam Tv
महाराष्ट्र

Nitesh Rane: नितेश राणे म्हणतात...आता भगव्याची जबाबदारी आमची

९३ च्या दंगली नंतर मुंबई मा. बाळासाहेबांनी वाचवली. आज त्यांचाच मुलगा मुख्यमंत्री असताना ९३ च्या दंगलीतील आरोपींना वाचवतो आहे..

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सिंधुदुर्ग: राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर शिवसेनेने (Shivsena) जेव्हापासून घरोबा सुरू केला आहे. तेव्हापासून भाजप शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यारून हिणवताना दिसून येत आहे. शिवसेनेचे हिंदूत्व आता पहिल्यासारखे राहिले नाही, शिवसेनेचे हिंदूत्व आता बेगडी हिंदूत्व झाले आहे, अशी टीका सतत भाजपकडून करण्यात येत आहे. आता भगव्याची जबाबदारी आता फक्त आमची आहे. बाकीचे काय करत आहेत हे तुम्ही पाहत आहात, असे म्हणत महाआघाडी सरकारवर पुन्हा हल्लाबोल करण्यात आला आहे. कॅबिनेट मंत्री म्हणून राहण्याचा नवाब मालिकांना कोणताही नैतिक आणि कायदेशीर अधिकार नाही. त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे, असा इशारा भाजपने काल दिला आहे. यामुळे ९३ च्या दंगली नंतर मुंबई मा.बाळासाहेबांनी वाचवली..आज त्यांचाच मुलगा मुख्यमंत्री असताना ९३ च्या दंगलीतील आरोपींना वाचवत आहे. असे सूचक ट्विट राणेंनी केले आहे.

हे देखील पहा-

महाविकास आघाडीतील नेत्यांवर ईडी (ED) भाजपच्या इशाऱ्यावरून कारवाई करत आहे, असा आरोप गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत सतत करत आहेत. महाविकास आघाडीनेही हीच भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच खुद्द मुख्यमंत्र्यांनी सुडाचे राजकारण सुरू आहे, म्हणत भाजपवर टीका करण्यात येत आहे. अशातच मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या ईडी चौकशीने राजकारण तापवले आहे. यावर दोन्ही बाजुने आता जोरदार प्रतिक्रिया उमटत आहे. भाजप सुड्याच्या भावनेतून कारवाई करत आहे. असा आरोप महाविकास आघाडी करत आहे, तर नवाब मलिक दोषी नसतील तर त्यांनी कोर्टात जावं असे भाजप नेते सांगत आहेत. मात्र नवाब मलिक जर दोषी असतील तर कारवाई करा अशी मागणी आम्ही करणारच, कारण जर मलिक डी गँगशी संबंध असतील तर देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, अशी गंभीर शंक भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उपस्थित केला आहे.

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादीचे (NCP) राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. पहाटे ६ च्या सुमारास सक्तवसुली संचालनालयाचे अधिकारी नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या घरी दाखल झाले होते. त्यानंतर मलिक यांची सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना 1 तास चौकशी केली. त्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले आणि तिथे त्यांची तब्बल सात-आठ चौकशी केली. आता अधिक चौकशीसाठी नबाव मलिक यांना ईडीकडून अटक (Arrested) करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) मनी लॉड्रिंग प्रकरणी (Money laundering case) नबाब मलिकांची चौकशी करण्यासाठी मलिकांना ताब्यात घेतलं असल्याचं समजले आहे.

काही दिवसांपुर्वी ईडीने इक्बाल कासकर आणि हसीना पारकर यांच्या घरावरही धाड टाकली होती. नबाब मलिकांना आता ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून नवाब मलिकांनी एनसीबी आणि भाजपविरुद्ध आघाडी उघडली होती. मलिकांना स्वतः भाकित केलं होतं की, मला ईडीची धमकी देण्यात येत आहे, मला ईडी कारवाईचे संकेत देण्यात येत आहे, मलाही फसवण्याचा प्रयत्न होईल असं नवाब मलिकांनी आधीच सांगतिलं होतं. याशिवाय मलिकांवर पाळतही ठेवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President: चर्चा ६ नावांची; वर्णी मात्र महाराष्ट्राच्या राज्यपालांची, राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यामागे काय आहे भाजपचा राजकीय डाव?

Hair Care Tips: केसांना दही लावल्याने होतात 'हे' भन्नाट फायदे

Video : तेरे जैसा यार कहाँ... गाणं म्हणणारे तहसीलदार निलंबित, निरोप समारंभाची पोस्ट पडली महागात

Maharashtra Politics : शिंदेसेनेला हादरा, नाराज नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत

Horoscope Monday : सोमवार ठरणार भाग्याचा, रखडलेली कामे होणार पूर्ण; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT