आता कोकणात जायला मोदींच्या नावाने रेल्वे; दानवेंची घोषणा! लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

आता कोकणात जायला मोदींच्या नावाने रेल्वे; दानवेंची घोषणा!

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ७ तारखेला कोकणात जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने स्पेशल मोदी रेल सोडणार असल्याची घोषणा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ७ तारखेला कोकणात जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने स्पेशल मोदी रेल सोडणार असल्याची घोषणा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे.

हे देखील पहा -

गणेशोत्सवासाठी कोकणमध्ये आधीच 150 रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. आवश्यकतेनुसार अजून रेल्वे गाड्यांची व्यवस्था कोकणात जाण्यासाठी केली जाईल अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यात पत्रकारांशी बोलताना दिली आहेयेणाऱ्या 7 तारखेला दादर स्टेशनवरून कोकणात जाण्यासाठी स्वतंत्र मोदी रेल सोडण्यात येणार असल्याचं देखील ते म्हणाले.

गणपती उत्सवाच्या काळात लोकांनी कोरोना संसर्गाचे निर्बंध पाळले पाहिजे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. त्यालाच समर्थन दर्शवत त्यांच्या या विधानाशी आपण सहमत असून निर्बंध लागू असताना देखील कोरोना काळात रेल्वे सोडायला आम्हाला अडचण नाही. मात्र, राज्य सरकारची सहमती त्यासाठी आवश्यक आहे असंही दानवे यांनी म्हटलं आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri 2026 : नवरात्रीत देवीसमोर 'या' दिशेला लावा अखंड दिवा; घरात येईल पैसाच पैसा

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीचा थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

IND vs SL ODI Fact Check: पहिला वनडे सामना दिल्लीऐवजी गुजरातमध्ये होणार? व्हायरल सत्य

Maharashtra News Live Update: ८ आठवड्यांच्या आत सर्व समित्या गठीत करा, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Talking in Sleep: झोपेत तुम्हीही बडबड करता? दुर्लक्ष करू नका, असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

SCROLL FOR NEXT