Jalyukt Shivar Abhiyan Saam Tv
महाराष्ट्र

आता पुन्हा जलयुक्त शिवार घोटाळ्याची २३ फेब्रुवारीला सुनावणी

डॉ. माधव सावरगावे

बीड - जिल्ह्यातील परळी तालुक्यातल्या जलयुक्त शिवार घोटाळ्याची २३ फेब्रुवारी रोजी पुन्हा लोकायुक्तांसमोर सुनावणी होणार आहे. जलयुक्त शिवार (Jalyukt Shivar) योजनेंच्या कामात झालेला गैरव्यवहार आणि आर्थिक घोटाळा, त्यावर पुढील कार्यवाहीसाठी लोक आयुक्तांसमोर ऑनलाइन सुनावणी होणर आहे. २०१५ ते २०१८ याकाळात परळी (Parali) वैजनाथ तालुक्यातील जलयुक्त शिवारच्या बोगस कामांबाबत अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांविरुद्ध कृषी विभागाकडून कार्यवाही होत नसल्याने वसंत संपतराव मुंडे यांनी तक्रार दाखल केली होती. (Jalyukt Shivar Abhiyan Latest News)

हे देखील पहा -

त्यानंतर परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यासोबतच ९४ लाख रुपये अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टरकडून वसूल करण्याचे आदेश कृषी विभागाने दिले. आता २३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सुनावणीबाबत बीडचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच पुणे येथील कृषी आयुक्तांना ऑनलाइन सुनावणीबाबत कळविण्यात आले आहे.

जलयुक्त शिवार योजनेतील घोटाळ्याप्रकरणी दोषींवर अटकेची आणि वसुलीची कारवाई करण्याचे आदेश आहेत. आरोपींना जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळालेला नाही. आरोपींना अटक करा आणि अपहारित रक्कम वसूल करा, असे आदेश न्यायालयाचे असताना कार्यवाही होत नसल्याबाबत तसेच कारवाई टाळण्यासाठी राजकीय हस्तक्षेप होत आहे. आता पुढच्या कारवाईबाबत या सुनावणीमध्ये काय पाऊल टाकले हे कळेल.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे ‘ही’ कार; जबरदस्त फीचर्ससह मिळत आहे 1 लाखांची सूट, जाणून घ्या किंमत

Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाने सोयाबीन भाव; फडणवीसांचा दावा

Bigg Boss Marathi Abhijeet Sawant: लांबसडक केस अन् साडी; अभिजीत बनला 'बाईss'; फोटो पाहताच नेटकरी म्हणाले... काय हा प्रकार

Navratri 2024: नवरात्री स्पेशल उपवासाला बनवा बटाट्याचा शिरा; वाचा रेसिपी

KDMC News : पाणी मिळालं नाही, तर केडीएमसीला टाळे ठोकू; शिंदे गटातील नेत्याचा केडीएमसी अधिकाऱ्याला तंबी

SCROLL FOR NEXT