लातूर: राज्यात राज्यसभा निवडणूकांसाठी (Rajyasabha Election) जोरदार रस्सीखेच सुरु आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. भाजपने आपला तिसरा उमेदवार उतरवल्याने महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. तसेच राज्यसभा निवडणूकीत भाजपचं एकही मत फुटणार नाही असं फडणवीस म्हणाले आहेत. (None of our votes will be split; Decision of Fadnavis regarding Rajya Sabha elections)
हे देखील पाहा -
औसा येथील भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांनी शेतकऱ्यांसाठी मनरेगातून ग्रामसमृद्धी हा उपक्रम राबवला आहे. यासाठी फडणवीस हे औसा येथे आले होते. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. फडणवीस म्हणाले की, सर्वच पक्षात सर्वच नेते आहेत त्यांनी दिवसा स्वप्न बघू नये. राज्यसभा निवडणुकीत भाजपचे एकही मत फुटणार नाही. ते त्याच्या पक्षात तंग झाले म्हणून ते इकडे आलेले आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच भाजपाकडे एजन्सी आहे तर आमच्याकडे राज्य सरकार असा दम आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला होता. राऊतांच्या या वक्तव्यावर कोण संजय राऊत? असा प्रति सवाल उपस्थित करत ते काय फार तत्ववेत्ते आहेत का? ते दिवस भर उलटसुलट बोलत असतात, त्याच्या प्रश्नावर मी का उत्तर देऊ? असं म्हणत त्यांनी राऊतांनाही टोला लगावला आहे.
Edited By - Akshasy Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.