राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत नाही: आरोग्यमंत्री राजेश टोपे Saam Tv News
महाराष्ट्र

राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत नाही: आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत सध्यातरी नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते जालन्यात बोलत होते.

लक्ष्मण सोळुंके

जालना: राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत सध्यातरी नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते जालन्यात बोलत होते. मात्र सणासुदीच्या काळात राज्यात होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ शकते, पण लसीकरणाची गती वाढवली तर संक्रमण जास्त होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. (No sign of third wave of corona in the state said Health Minister Rajesh Tope)

हे देखील पहा -

25 आणि 26 तारखेला आरोग्य विभागाकडून गट क आणि ड या पदासाठीच्या 6 हजार 200 जागांसाठी परीक्षा घेण्यात येणार असून परीक्षा केंद्रावर जॅमर बसवले जाणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली. जॅमर बसवल्यामूळे परीक्षेदरम्यान कॉपी सारख्या प्रकाराला आळा बसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या परीक्षा अत्यंत पारदर्शकपणे पार पडेल असंही ते म्हणाले.

राज्यात सध्या दररोज 13 ते 14 लाख जणांना लसीकरण करण्यात येत असून डेल्टाची रुग्णसंख्या सध्या राज्यात स्थिर आहे त्यामुळे नागरीकांनी कोरोनाच्या नियमांचं पालन करावं असंही टोपे म्हणाले. राज्यात दररोज 15 ते 20 लाख लसीकरण करण्याचा आरोग्य विभागाचा मानस असून आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन लसीकरण करून घेण्यासाठी फिरत असल्याचं देखील टोपे यांनी स्पष्ट केलं.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Valache Birde Recipe: अस्सल पारंपारिक पद्धतीचा वालाचा बिरडा कसा बनवायचा?

Kalyan : कल्याणमध्ये कायदा सुव्यवस्था धाब्यावर; नशखोरांची घरात घुसून दुकानदार दाम्पत्याला मारहाण

Maharashtra Live News Update : पनवेलजवळ मालगाडी रुळावरून घसरली; रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत

कल्याण-डोंबिवलीकरांनो सावध राहा; ग्रामीण पट्ट्यात बिबट्याची एन्ट्री, नागरिक दहशतीत

राज्यातील सर्व शाळा उद्या बंद; पुण्यात उद्या शिक्षक शिक्षकेतर संघटनेचा एल्गार

SCROLL FOR NEXT