No rakshabandhan celebration in buldhana saam tv
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील 'या' गावात बहीण भावाला राखी बांधत नाही; श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी नेमकं काय घडलं होतं?

महाराष्ट्रातील एका गावात रक्षाबंधन साजरा केला जात नाही, कारण...

साम टिव्ही ब्युरो

संजय जाधव

बुलडाणा : बहिण-भावाच्या पवित्र नात्याला जपण्याचा दिवस म्हणजे रक्षाबंधन. आज संपूर्ण देशभरात रक्षाबंधन (Rakshabandhan festival) साजरा केला जात आहे. बहिण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधून ओवाळणी करुन पवित्र नात्याची गाठ आणखीनच घट्ट करते. परंतु, महाराष्ट्रातील बुलडाण्यात एक गाव असं आहे, जिथे रक्षाबंधन साजरा केला जात नाही. वानखेड असं या गावाचं नाव आहे. या गावात कोणतीच बहिण भावाला राखी बांधत नाही.

....म्हणून वानखेड गावात रक्षाबंधन साजरा होत नाही

बुलडाणा जिल्ह्यातील वानखेड नावाचं गाव. जवळपास सात हजार लोकसंख्या असलेलं हे वानखेड गाव. या गावात पालिवाल समाज मोठ्या प्रमाणात आहे.आजपासून तब्बल ३३२ वर्षांपूर्वी राजस्थानच्या पाली राज्यातून हा समाज व्यवसायानिमित्त या गावात वास्तव्यास आला आणि तेव्हापासून इकडेच आहे. ३३२ वर्षांपूर्वी पाली राज्यावर मुस्लिम शासकाने हल्ला केला होता व त्या राज्यात मोठा नरसंहार झाला होता. प्रचंड जीवितहानी झाली होती आणि तो दिवस होता श्रावणी पौर्णिमेचा.

श्रावणी पोर्णिमेच्या दिवशी अर्थात रक्षाबंधनाच्या दिवशी आपले हजारो वंशज मारले गेल्याने या समाजाकडून रक्षाबंधन साजर केला जात नाही. तर गावातील पालिवाल समाजाचे लोक दरवर्षी एका मंदिरात जमतात व आपल्या पूर्वजांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करून "एकता दिन" म्हणून साजरा करतात. या दिवशी गावातील एकही बहीण आपल्या भावाला राखी बांधत नाही. एवढच नाही तर घरात गोड पदार्थही ठेवत नाही. हा सण मोहंमद गझनीच्या निषेधार्ह दिन म्हणून ही साजरा करतात. इतिहासातील अनेक घटनांनी कुणाचं जीवन कसं बदललं आहे, हे यावरून दिसून येत.संपूर्ण जगात भावा-बहिणीच्या प्रेमाचं दिवस आपल्या पूर्वजांच्या आठवणीत साजरा होतो, तर कुठे मोठ्या उत्साहात.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

SCROLL FOR NEXT