Jalna IT Raid : १५० कार, ३९० कोटींचं घबाड; २५० IT अधिकाऱ्यांचं असं होतं मिशन 'राहुल वेड्स अंजली'!

जालन्यातील बेहिशेबी मालमत्ता असलेले कारखाने आयकर विभागाच्या रडारवर होते, कारण...
Jalna Income Tax Raid News
Jalna Income Tax Raid NewsSaam Tv
Published On

अभिजीत सोनावणे

नाशिक : आयकर विभागाला जालन्यात बेहिशेबी मालमत्तेचं घबाड सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. आयकर विभागाने (Income Tax Department) जालन्यात धडक कारवाई करत एका उद्योगपतीची तब्बल ३९० कोटींची मालमत्ता जप्त केलीय. जालन्यातील बेहिशेबी मालमत्ता असलेले कारखाने आयकर विभागाच्या रडारवर होते. त्यानंतर आयकर विभागाने २५० अधिकाऱ्यांच्या माध्यमातून 'राहुल वेड्स अंजली मिशन मोठ्या शीताफीनं राबवलं. त्यामुळे जालन्यात आयकर विभागाची 'कुछ कुछ होता है' सिनेमाची टीमंच छापे टाकण्यासाठी आली असल्याच्या चर्चा रंगल्या. लग्नाचे वऱ्हाडी बनून आलेल्या आयकरच्या पथकानं जालन्यातील बेहिशेबी मालमत्ता जप्त केल्यानंतर जालन्यात 'गोंधळ ' उडाला.

Jalna Income Tax Raid News
Bhool Bhulaiyaa 3 : 'भूल भुलैया ३' मध्ये कियारा अडवाणी नसणार? 'ही' अभिनेत्री करणार कार्तिकसोबत रोमान्स

दरम्यान, आयकर विभागाने (Property Seized) ३९० कोटींची मालमत्ता जप्त केली. या कारवाईत ५८ कोटींची बेहिशेबी रोकड, ३२ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आयकर विभागाच्या जवळपास ३०० अधिकाऱ्यांनी जालन्यातील (Jalna) अनेक ठिकाणी धाडी टाकल्या. पंरतु, आयकर विभागानं मोठ्या शीताफीने मिशन स्टील राबवलं. याबाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे

राज्यातील आयकर विभागाची आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

आयकर विभागाच्या छाप्यात सापडलं रोख रक्कमेचं घबाड

आयकर विभागाने ३ ते ८ ऑगस्ट दरम्यान सुरु ठेवले कारवाईचे सत्र

आयकर विभागाच्या रडारवर जालन्यातील दोन बडे उद्योजक होते.

नाशिक, पुणे आणि नागपूर येथील आयकर विभागाची कारवाई

कारवाईबाबत कुणालाही समजू नये यासाठी आयकरची पथकं वेगवेगळ्या ठिकाणी तळ ठोकून बसली होती.

नाशिकचे पथक शिर्डित होते तळ ठोकून

जवळपास ३०० अधिकाऱ्यांनी केली कारवाई

कारवाईसाठी तब्बल १५० खासगी गाड्यांचा वापर

एका कंपनीची वार्षिक उलाढाल १ हजार कोटींहून अधिक

एकाच वेळी दोन कंपन्यांच्या ३२ वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई

जालना, औरंगाबाद, नाशिक, मुंबई, पुणे आणि कोलकाता अशा ३२ ठिकाणी आयकर विभागाची कारवाई

जालन्याच्या धाडीत ५६ कोटींची रोख रक्कम जप्त

१४ कोटींचे सोने, सोन्याचे दागिने,सोन्याचे बिस्कीटही जप्त

उर्वरित ३५० कोटींच्या आसपास बेहिशोबी आर्थिक व्यवहार

राज्यात सर्वाधिक लोखंडी गज उत्पादन करणाऱ्या जालना येथील स्टील कारखान्यावर आणि घ तसेच कार्यालयांवर आयकर विभागाने छापा टाकला .या छाप्यात जवळपास ३९० कोटींची बेहिशेबी मालमत्तेचा पर्दाफाश झाला. यामध्ये ५८ कोटींची रोकड,३२ किलो सोन्याचे दागिने,हिरे,मोती असा १६ कोटींचा ऐवज तसेच ३०० कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेच्या कागदपत्रांसह महत्त्वाचा दस्तऐवज जप्त करण्यात आला आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com