Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: अपात्र लाडक्या बहिणींकडून दंडासह पैसे वसूल होणार? आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितले, म्हणाल्या...

Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जाणार आहे. पडताळणीनंतर अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परस्पर काढून घेणार असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत गेल्या अनेक दिवसांपासून अनेक चर्चा सुरु झाल्या आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. परंतु लाडकी बहीण योजनेत अपात्र असूनही लाभ घेतलेल्या महिलांकडून दंड वसूल करणार असल्याचीही चर्चा रंगली होती. मात्र, असं काहीही होणार नसल्याची माहिती आदिती तटकरेंनी दिली आहे. (Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेत दिलेले पैसे परत घेण्याचा कोणताही विचार नसला तरी यापुढे निकषात बसणाऱ्या लाभार्थी महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा, यासाठी उपाययोजना करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. (Ladki Bahin Yojana Update)

लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत लाखो महिलांनी लाभ घेतला आहे. या योजनेत अनेक अपात्र महिलांनी लाभ घेतला असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.या महिलांकडून पैसे सरकारकडून परस्पर काढून घेणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

लाडकी बहीण योजनेबाबत स्पष्टीकरण आदिती तटकरे यांनी दिले आहे. लाभार्थी महिलांकडून परस्पर पैसे परत घेणार नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.परंतु जर तुम्ही निकषात बसत नसाल तर स्वतः हून पैसे परत करावेत,असं आमचे आवाहन आहे. पैसे करत करण्यासाठी संकेतस्थळावर स्वतंत्र लिंक टाकली आहे. अनेक महिलांनी आम्हाला पैसे परत केले आहेत.

या योजनेत नव्याने कोणतेही निकष तयार केले जाणार नाही.जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांना हप्ता दिला जाईल. यावेळी लाभार्थ्यांची संख्या कमी झाल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात पाण्याच्या शोधात असणारा बिबट्या विहिरीत पडला

Seviyan Kheer Recipe: सणासुदीला घरी आलेल्या पाहुण्यासाठी झटरपट बनवा स्वादिष्ट शेवयाची खीर, वाचा सोपी रेसिपी

संतापजनक! बाथरूमच्या फलकावर लावला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो

वीर सावरकर बदनामी प्रकरणात मोठी अपडेट; सात्यकी सावरकरांकडून अचानक तो अर्ज दाखल, कोर्टात नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav: जेलमधून बाहेर आल्यानंतर राजपाल यादव पुन्हा कामाला लागला; हसवणाऱ्या कलाकराने रडत रडत सगळा घटनाक्रम सांगितला

SCROLL FOR NEXT