- जितेश कोळी
Mumbai Goa Highway News : मुंबई गोवा महामार्गांवरील परशुराम घाटातील (Mumbai Goa Highway Parshuram Ghat) वाहतूक बंद ठेवण्याबाबत प्रशासनाने अद्याप कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. पुढील एक-दोन् दिवसांमध्ये पर्यायी मार्गाची चाचपणी करून घाट रस्ता येथे काम केले जाईल. त्या कालावधीत या घाटातील वाहतुक बंद ठेवली जाईल. त्याबाबतचा आदेश लवकरच जाहीर हाेईल अशी माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. (Breaking Marathi News)
गेल्या दाेन दिवसांपासून समाज माध्यमातून (Social Media) आजपासून (ता. 27 मार्च ते तीन एप्रिल) परशुराम घाटातील वाहतूक दुपारपासून संध्याकाळ पर्यंत बंद ठेवली जाणार असल्याचे संदेश व्हायरल झाले. त्यामुळे अनेकांचा या घाटातील वाहतुक आजपासून बंद राहील असा समज झाला. त्यातून गाेंधळ निर्माण झाला.
दरम्यान पावसाळ्यापूर्वी परशुराम घाटातील काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी ठेकेदार कंपनीने प्रशासनाला (27 मार्च ते 3 एप्रिल) या कालावधीत या घाटातील वाहतूक दिवसा बंद ठेवण्याची परवानगी लेखी पत्राद्वारे मागितली आहे. या पात्राला अनुसरून जिल्हाधिकारी कार्यालयाने पोलिसांना पर्यायी मार्गाची चाचपणी करण्यासाठी पाठवलेले पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले.
यामुळेच परशुराम घाटातील वाहतूक आजपासून बंद असल्याचे संदेश सर्वत्र पसरले. परंतु प्रत्यक्षात आज घाटातील वाहतुक सुरु आहे. प्रशासनाने अद्याप वाहतूक बंद करण्याबाबतचा काेणताच निर्णय घेतलेला नाही (no decision has been taken yet to close the traffic of parshuram ghat) असे सांगण्यात आले आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.