पावसाळा सुरू झाल्यापासून सातारा जिल्ह्यातील निसर्गरम्य पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढताना दिसत आहे. विशेषत म्हणजे महाबळेश्वर, पाटण, ठोसेघर, कास पठार, सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील धबधबे आणि दऱ्या हे पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहेत. पण जोरदार पावसामुळे अनेक भागांत दरडी कोसळण्याच्या घटना घडत असून, अशा ठिकाणी जीवितहानी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
सर्वप्रथम तर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी स्पष्ट केलं आहे की, सातारा जिल्ह्यातील कोणत्याही पर्यटनस्थळावर बंदी घालण्यात आलेली नाही. मात्र, पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेता काही आवश्यक सूचना आणि नियम लागू करण्यात आले आहेत. पर्यटकांनी या सूचनांचं पालन करावं, अन्यथा अपघात(Accident) अथवा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरवर्षी पावसाळ्यात धबधब्यांच्या जवळ किंवा दरीच्या कड्यांवर उभं राहून सेल्फी काढण्याच्या नादात अनेक अपघात होतात. पण काही प्रकरणांत पर्यटकांचा जीवही गेला आहे. हे लक्षात घेऊन यंदा धबधब्यांच्या शेजारी आणि धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून यावर कडक नजर ठेवण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं की, सातारा(Satara) जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांचं स्वागत आहे. जिल्हा निसर्गसंपन्न असून येथे अनेक अप्रतिम ठिकाणं बघण्यासारखी आहेत. मात्र, निसर्गाचा आनंद घेताना आपली आणि इतरांची सुरक्षितता यालाही तितकंच महत्त्व द्यायला हवं. प्रत्येकाने नियमांचं पालन केल्यास कुठलीही बंदी घालण्याची गरज भासणार नाही, असंही त्यांनी नमूद केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.