Nitin Gadkari Massive Convoy: saam tv
महाराष्ट्र

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर नितीन गडकरींचा बसमधून प्रवास, पण कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा; ताफ्यात 1-2-3 नव्हे तब्बल 40 वाहनं

Nitin Gadkari Massive Convoy: पंतप्रधान मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतरही मोठा वाहन ताफा दिसल्याने चर्चा सुरू झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील एका कार्यक्रमादरम्यान हा प्रकार समोर आला.

Bharat Jadhav

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधन बचतीचे आवाहन केले. त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत आहेत. कुणी मेट्रोने प्रवास करतोय तर कोणी इलेक्ट्रिक कार वापरत आहेत. तर कोणी मोटरसायकलने प्रवास करत आहेत. पंतप्रधानांच्या आवाहनानुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी बसमधून प्रवास केला. गडकरींच्या ताफ्यात अद्याप तीन गाड्या असून ज्या ठिकाणी कार्यक्रम होता त्या ठिकाणी मात्र कार्यकर्त्यांच्या 40 ते 50 गाड्या असल्याचे दिसले.

बुलढाण्यात आज केंद्रीयंत्री प्रतापराव जाधव यांचा हस्ते मॉडेल डिग्री कॉलेजचं भूमिपूजन कार्यक्रम होता. त्यासाठी जाधव आज जिल्ह्यात आले होते. मंत्री जाधव यांच्या ताफ्यात तीन गाड्या आणि कार्यक्रमस्थळी अनेक वाहनांची उपस्थिती यावरून पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला मंत्र्यांकडूनच हरताळ असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान खर्च कमी करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी बसमधून प्रवास केला. मात्र कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा मोठा होता. पंतप्रधान मोदी यांच्या पेट्रोल बचतीच्या आवाहनानंतरही मंत्र्यांच्या ताफ्यात गाड्यांची संख्या लक्षणीय असल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT