Nitin Gadkari  Saam Tv
महाराष्ट्र

Nitin Gadkari : खाली हाथ आया, खाली हाथ जाएगा!... नितीन गडकरींनी दिला आनंदी राहण्याचा मंत्र

Bharat Jadhav

Union Minister Nitin Gadkari :

जीवनात आनंदी कसं राहायचं याचा मंत्र केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिलाय. 'मनातले गडकरी' या सदराखाली अभिनेते प्रशांत दामले यांनी नितीन गडकरी यांची मुलाखत घेतली. या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत नितीन गडकरी यांनी माणसानं आनंदी राहण्याचा मंत्र दिला. (Latest News)

नितीनजी सर्वांना आनंदी राहायला आवडतं, तर भारताचा हॅप्पी ह्युमन इंडेक्स वाढण्यासाठी तुमच्या कल्पना काय आहेत? असा पहिलाच प्रश्न अभिनेते प्रशांत दामले यांनी केला. त्यावर उत्तर देताना गडकरींनी भूतानच्या पंतप्रधानांनी युनोमध्ये केलेल्या भाषणाची आठवण करून दिली. डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स अशी व्याख्या करून त्यांनी विचार मांडल्याचं गडकरी म्हणाले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

माणसानं नेमकं आनंदी राहण्यासाठी काय करावं, याबद्दल सांगताना नितीन गडकरींनी आपल्या एका जुन्या भाषणाचं उदाहरण दिलं. ते भाषण खूपच व्हायरल झालं होतं. 'जे राज्यात बेकार होते त्यांना दिल्लीमध्ये पाठवलं. जे दिल्लीत बेकार होते, त्यांना गव्हर्नर केलं. गव्हर्नर होऊ शकले नाहीत, त्यांना अॅम्बेसिडर केले, असं मी त्या भाषणात म्हणालो होतो, असे ते म्हणाले. मुळात आयुष्यात आर्थिक, सामाजिक, राजकीयदृष्ट्या काम करत राहावं. प्रयत्न करत राहावे, मला हेच करायचंय, अशी भावनाही ठेवावी पण, मिळालं किंवा काही मिळालं नाही याचा विचार करू नये, आनंदी राहण्याचा हा चांगला मार्ग आहे. सगळ्यांना विनंती आहे. भविष्याचा विचार करणं सोडून द्यावं, असं ते म्हणाले. खाली हाथ आये थे, खाली हाथ जाना आहे, या आयुष्यातील सत्य मांडणाऱ्या ओळींचा उल्लेख करत, माणसानं भविष्याची चिंता करू नये, असा सल्ला गडकरी यांनी दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Acidity Problem: छातीतील जळजळ कमी करण्यासाठी करा 'हे' उपाय

Amruta Khanvilkar: तुझ्या रूपानं केलया घायाळ; चंद्राचा लूक पाहिलात का?

Benefits of Laughing: स्वत:ही हसा दुसऱ्यांनाही हसवा; जाणून घ्या हसण्याचे फायदे

Assembly Election 2024 : महायुतीतील जागावाटपाचा तिढा केव्हा सुटणार? प्रमुख नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरू, पाहा VIDEO

Maharashtra News Live Updates : मराठा समन्वयकांमध्ये गोंधळ; शरद पवार गटाच्या महिला नेत्याने पक्षाची भूमिका जाहीर केल्याने तणाव

SCROLL FOR NEXT