Nitesh Rane Saam Tv
महाराष्ट्र

10 दिवसात आत्मसमर्पण करा; नितेश राणेंचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला

तोपर्यंत त्यांना राज्य पोलिसांपासून अटकेचे संरक्षण मिळाले आहे.

वृत्तसंस्था

मुंबई: भाजप आमदार नितेश राणे यांच्या अडचणी दिवसेंंदिवस वाढ होताना दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात कोर्टाने राणे यांना 10 दिवसात आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या 10 दिवसात राणेंना जिल्हा न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. तोपर्यंत त्यांना राज्य पोलिसांपासून अटकेचे संरक्षण मिळाले आहे. (Nitesh Rane Bail Hearing Updates)

कणकवलीतील शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) या याचिकेवर सुनावणी पार पडली. ज्येष्ठ वकील मुकूल रोहोतगी यांनी राणेंची बाजू मांडली. मात्र कोर्टाने राणेंचा जामीन अर्ज फेटाळला आहे. 10 दिवसात जिल्हा कोर्टात हजर न झाल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत त्यांना कोर्टाने संरक्षण दिले आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

सिंधुदुर्ग जिल्हा बँक (Sindhudurg DCC) निवडणूक प्रकरणी राजकीय संघर्षातून शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. हा हल्ल्यामागे नितेश राणे यांचा हात असल्याचा आरोप परब यांनी केला होता. पोलिसांनी दिल्लीतून एका मास्टरमाईंडला अटक देखील केली होती. यानंतर राणेंचं नाव समोर आलं. याप्रकरणी नितेश राणेंवर गुन्हाही दाखल करण्यात आला. या प्रकरणात आपल्याला अटक होऊ नये म्हणून सुरुवातीला नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु तिथेही राणेंना दिलासा मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी हायकोर्टातही धाव घेतली. पण दोन्हीकडेही नितेश राणेंना कोणताच दिलासा मिळाला नाही.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shadashtak Yog: मंगळ-शनी मिळून बनवणार षडाष्टक योग, 'या' राशींचा होणार कायापालट, धनलाभ होणार

Vivek Oberoi : विवेक ओबेरॉयने खरेदी केली आलिशान कार, किंमत ऐकून डोळे भिरभिरतील

Maharashtra News Live Updates: एसटी बसच्या अपघातात सातत्याने वाढ, वर्षभरात 3 हजार 381 अपघात

Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीत महायुतीचा अभूतपूर्व विजय, तर महाविकास आघाडीला मोठा फटका

Gokul Milk Price: शेतकऱ्यांना मोठा धक्का! गोकुळ दूध खरेदीत ३ रुपयांनी कपात

SCROLL FOR NEXT