Political News
Political News Saam Tv
महाराष्ट्र

Political News: वडील आजारी असताना आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होण्याचं षडयंत्र रचत होते...; नितेश राणेंचा खळबळजनक दावा

साम टिव्ही ब्युरो

Nitesh Rane : राज्याच्या राजकारणात भावी मुख्यमंत्री कोण असणार यावरून मोठी चर्चा रंगली आहे. अशात विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून लागलेले बॅनर चर्चेत असताना आता नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंविषयी मोठा दावा केला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारी असताना आपण मुख्यमंत्री व्हावं यासाठी आदित्य ठाकरेंच्या हालचाली सुरू होत्या, असं नितेश राणेंनी म्हटलं आहे. (Political News)

पत्रकार परिषद घेत नितेश राणेंनी हा दावा केला आहे. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंची नक्कलही करुन दाखवली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात उपचार घेत होते तेव्हा बाहेर त्यांच्या मुलाने वेगळंच षडयंत्र रचलं होतं. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) त्यावेळी मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पाहात होते, असं नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले.

पुढे आदित्य ठाकरेंची नक्कल करत नितेश राणे यांनी म्हटलं आहे की, "माझे वडील आजारी आहेत. आता ते बरे होणार नाहीत, असं आदित्य ठाकरे बोलायचे. आपल्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी जसलोक रुग्णालयात बैठका देखील घेतल्या होत्या.रुग्णालयात कोणत्या रुममध्ये बैठका होत होत्या हे मी सांगू शकतो. सीसीटीव्ही फुटेज देखील समोर दाखवू शकतो, असं नितेश राणे यांनी ठामपणे सांगितलं.

तसेच पुढे हे प्रकरण कसं थांबलं याबाबत सांगताना नितेश राणे म्हणाले की, जेव्हा जसलोक रुग्णालयात या बैठका सुरू होत्या त्यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोध केला. त्यामुळे हे प्रकरण थांबलं असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांचा आदेश त्यांचा शिपाईही मानत नाही...

रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली. गावातील ७० टक्के लोक प्रकल्पाच्या बाजूने आहेत याचा तु्म्ही काही सर्वे केला होता का? असा प्रश्न राऊतांनी विचारला होता. त्यावर उत्तर देत नितेश राणेंनी म्हटलं की, सरकारने सर्व्हे केला नव्हता तर प्रकल्पाच्या विरोधात लोक आहेत हे पाहण्यासाठी राऊतांनी तरी सर्व्हे केला होता का?, असा प्रश्न नितेश राणेंनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे यांचा आदेश त्यांचा शिपाईही मानत नाही. बारसूतील लोक काय मानणार? आधी राजन साळवी यांचं मन वळवा मग पुढच्या गप्पा मारा, अशी खोचक टीका यावेळी नितेश राणेंनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Tree : आंध्रप्रदेशमधलं निसर्गाचं अद्भुत सौंदर्य; चक्क झाडांच्या खोडातून मिळतं पिण्याचं पाणी

Uddhav Thackeray On Narendra Modi | गाईपेक्षा महागाईवर बोला, ठाकरे बरसले

Sunil Tatkare: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ महायुतीत नाराज? सुनिल तटकरेंनी केला महत्वाचा खुलासा; म्हणाले...

Char Dham Yatra: चारधाम यात्रेदरम्यान रील बनवण्यावर बंदी, व्हीआयपी दर्शनही बंद; सरकारकडून नवा आदेश जारी

Today's Marathi News Live : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना, तपास गुन्हे शाखेकडे

SCROLL FOR NEXT