Nitesh Rane Saam Tv
महाराष्ट्र

Sindhudurg: 'आम्ही कसं सांगणार, नितेश राणेंना कधी, कूठं अटक करायची ते पाेलिस ठरवतील'

आजच्या सुनावणीकडे सा-या राज्याचे लक्ष लागून राहिले हाेते.

संभाजी थोरात

सिंधूदुर्ग : नितेश राणेंना (nitesh rane) मागच्या दारानं जामीन मिळाला अशी टिप्पणी करीत आम्ही असं म्हणणार नाही त्यांना अटक करा. पाेलिस सर्वाेच्च न्यायालयाचा आणि आज झालेल्या निकालाचा हुकुमाचा विचार करतील. त्यातून सार काढतील आणि निर्णय घेतील. अटक करायची हा पाेलिसांचा काॅल आहे. आमचा नाही. नितेश राणेंना (nitesh rane latest marathi news) कधी कूठ अटक करायची हे पाेलिसांनी ठरवावं असं सरकारी वकील प्रदीप घरत (public prosecutor pradip gharat) यांनी सिंधूदूर्ग न्यायालयाच्या बाहेर (sindhudurg court) माध्यमांशी बाेलताना स्पष्ट केले. (nitesh rane bail rejected i sindhudurg court today in santosh parab case)

प्रदीप घरत म्हणाले नितेश राणे (nitesh rane) हे न्यायालयात शरण (लेखी स्वरुपात) आले नाहीत. त्यांनी केवळ जामीन अर्ज दाखल केला. त्या धर्तीवर आज न्यायालयात (court) जामीन अर्ज फेटाळण्यात आला. राणे हे बाहेर जाऊ शकतात असे घरत यांनी नमूद केले. पाेलिसांनी त्यांना कधी कूठ अटक करायची हे ठरवायचे आहे कारण आजच्या निकालाबाबत त्यांना कस्टीडत घ्या असं म्हटलं नाही. (nitesh rane latest news)

दरम्यान न्यायालयाने निकाल दिल्यानंतर सिंधुदूर्ग न्यायालयाच्या बाहेर पाेलिस आणि राणे समर्थक यांच्यात वादावादी झाली. पाेलिसांनी नितेश राणेंचे गाडी पुढं जाऊ न दिल्याने निलेश राणे भडकले. माजी खासदार निलेश राणे (nilesh rane) हे गाडीतून उतरले. ते पोलीसांशी चर्चा करु लागले. या चर्चेतून मोठी वादावादी झाली. आता कोर्टाचा अवमान कोण करतय? असा प्रश्न निलेश राणेंनी पाेलिसांनी केला. यावेळी भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले हाेेते.

कायदा शिकवू नका : निलेश राणे

कायदा शिकवू नका , ओपन कोर्टात निर्णय झाला आहे असे निलेश राणेंनी पाेलिसांना सुनावलं. त्यावेळी घटनास्थळी मोठी धक्काबुक्की झाली. निलेश राणे यांनी धक्का बुक्की करत नितेश राणेंना घेऊन चालत पुढं निघाले. यावेळी कार्यकर्ते आक्रमक झाले हाेेते. कुठल्या अधिकाराखाली आम्हाला अडवलय असे निलेश राणे पोलिसांना म्हणत नितेश समवेत पुन्हा कोर्टात गेले.

सर्वोच्च न्यायालयाचा पोलीसांनी अवमान केला असून पोलीस नितेश राणेंना अटक करू शकत नाहीत असं राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी नमूद केले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या दहा दिवसांची मुदत असल्यामुळे पोलीस त्यांना अटक करू शकत नाहीत. नितेश राणेंना नियमित जामिनासाठी हायकोर्टात जाण्याची जिल्हा सत्र न्यायालयाची मुभा मिळाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज्याचा पारा घसरला, पुण्यासह मुंबई गुलाबी थंडीने गारठले

Local Body Election : निवडणुकीपूर्वी ठाकरेंना मोठा धक्का, कल्याणच्या जिल्हाप्रमुखांसह ८ नगरसेवक भाजपमध्ये

Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या अडचणी वाढल्या, पोलिसांची नोटीस धडकली, नेमकं प्रकरण काय?

Solapur politics : एकनाथ शिंदेंना जोरदार धक्का, तानाजी सावंतांच्या भावाने साथ सोडली, आता कमळ हातात घेणार

Maharashtra Winter Alert : गुलाबी थंडीची चादर! मुंबई-पुण्यासह राज्याचा पारा घसरला, पावसानंतर गारठा वाढला

SCROLL FOR NEXT