Nishikant Dubey Mumbai Saam Tv
महाराष्ट्र

Nishikant Dubey Mumbai Connection : मराठी माणसाला धमकी देणाऱ्या निशिकांत दुबेंचं मुंबई कनेक्शन; कोट्यवधींची प्रॉपर्टी, नोकरीही केली

Nishikant Dubey Property : भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्या मराठीविरोधी वक्तव्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. मराठी माणसाला थेट धमकी देणाऱ्या दुबेंचं आता महाराष्ट्रातील कनेक्शन उघड झालंय. मुंबईतील खार येथे त्यांचं आलिशान फ्लॅट देखील आहे.

Alisha Khedekar

राज्यात मराठी हिंदी भाषक वाद सुरू असतानाच या वादाची ठिणगी राज्याच्या राजकारणात पडली. अमराठी नेत्यांनीही या वादात उडी घेतली. ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडल्यानंतर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्राविषयी गरळ ओकणाऱ्या आणि मराठी माणसाला धमकी देणाऱ्या याच दुबेंनी मात्र, मुंबईत नोकरी केलीय. याशिवाय याच महाराष्ट्राची मायानगरी असलेल्या मुंबईत कोट्यवधींची प्रॉपर्टीदेखील आहे.

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी विरोधात आगपाखड करताना केवळ ठाकरेंनाच आव्हान दिलेलं नाही तर महाराष्ट्रातील १३ कोटी मराठी माणसाच्या अस्तित्वालाच डिवचलं आहे, अशा मराठी माणसाच्या भावना आहेत. हिंदीसक्ती विरोधात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील माणूस पेटून उठला. मराठीवरून एकी झाल्यानं महाराष्ट्रातील अमराठी नेत्यांच्या पोटात दुखू लागलंय, असं चित्र निर्माण झालं आहे.

"हिंदी भाषकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा. मराठी भाषक आमच्याच पैशांवर जगतात, असं वक्तव्य दुबे यांनी केलं होतं. महाराष्ट्र, मराठी माणूस आणि मुंबईविषयी गरळ ओकणारे हेच निशिकांत दुबे सुरुवातीच्या काळात मुंबईतच राहिल्याचे बोलले जात आहे. मुंबईतील खार पश्चिमेला त्यांचं आलिशान घर असल्याचं समोर आलं आहे. दुबेंच्या मुंबईतील घराची सध्याची किंमत २ कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जाते. महाराष्ट्राकडे स्वतःच काय आहे असं म्हणणारे भाजप खासदार निशिकांत दुबे गेली १६ वर्षे मुंबईतील उच्च्भ्रू सोसायटीत राहत आहेत.

धक्कादायक म्हणजे महाराष्ट्रात कोणतेही उद्योग नाही, असे म्हणणाऱ्या दुबे १९९३ ते २००९ साली मुंबईत एका बड्या कंपनीत संचालक पदावर कार्यरत होते. २००९ मध्ये दुबे यांनी निवडणूक लढवताना प्रतिज्ञापत्रात खार येथील ज्युलेलाल सोसायटीतील फ्लॅटचा सविस्तर उल्लेख केला होता. दुबे यांचे मुंबई कनेक्शन उघड झाल्यावर राज्याच्या राजकारणात कोणती नवी चर्चा सुरु होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

US Visa: अमेरिकेचा मोठा निर्णय! व्हिसा शुल्कात १४८ टक्क्यांनी वाढ; पर्यटक आणि विद्यार्थ्यांच्या खिशाला फटका

Jalgaon Crime News : दारू देण्यास नकार, तरुणांची सटकली; हॉटेल मालकावर अंदाधुंद गोळीबार, जळगावमध्ये खळबळ

Maharashtra Live News Update : सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी विधान परिषदेमध्ये चर्चा

Pune News: गणेशोत्सवाआधी पुण्यातील ढोल-ताशा पथकांना आनंदाची बातमी, पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

GK: सूर्योदय-सूर्यास्त वेळी सूर्य लाल का असतो? यामागे लपलंय रहस्य

SCROLL FOR NEXT