Nashik Accident  Saam
महाराष्ट्र

Nirmala Gavit: निर्मला गावित यांच्या अपघातामागे कट होता का? पोलिसांनी केला मोठा खुलासा

Nashik Accident: नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या माजी आमदार निर्मला गावित यांना कारने धडक दिली. नातवासोबत वॉकला जात असातना त्यांना कारने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या.

Priya More

Summary -

  • माजी आमदार निर्मला गावित यांना कारने धडक दिली

  • या अपघातामध्ये निर्मला गावित गंभीर जखमी झाल्यात

  • पोलिसांनी अपघातानंतर २४ तासांत कारचालक रामनाथ चौहानला अटक केली

  • अपघातामागे कोणताही कट नसल्याचे पोलिसांनी केले स्पष्ट

शिवसेना शिंदे गटाच्या माजी आमदार निर्मला गावित यांना भरधाव कारने धडक दिल्याची घटना घडली होती. नातवासोबत वॉकसाठी जात असताना त्यांना पाठीमागून आलेल्या कारने उडवले. या अपघातामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. निर्मला गावित यांच्या अपघातामागे कट होता की नाही याबाबत मोठा खुलासा पोलिसांनी केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारचालकाला अटक केली आहे. या अपघातामागे कोणताही कट नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

निर्मला गावित यांच्या अपघातामागे कोणताही कट नाही. कारचालकाकडून अनावधानाने अपघात झाल्याचा चौकशीनंतर पोलिसांनी खुलासा केला. कारचालक रामनाथ चौहानला पोलिसांनी अटक केली. कार चालवताना ब्रेक दाबण्याऐवजी एक्सलेटर दाबला गेल्याने हा अपघात झाला असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगवेंद्र सिंह राजपूत यांनी सांगितले.

मंगळवारी संध्याकाळी नातवासोबत वॉक करत असताना माजी आमदार निर्मला गावित यांना पाठीमागून कार चालकाने धडक दिली होती. या अपघातामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. सध्या त्यांच्यावर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर २४ तासांच्या आत नाशिक पोलिसांनी कारचालकाला अटक करत कायदेशीर कारवाई केली. पोलिसांनी कार देखील जप्त केली आहे. कारचालकाचे नाव रामनाथ चौहान असून नाशिकच्या म्हसरूळ परिसरातून पोलिसांनी त्याला अटक केली. अपघातानंतर रामनाथ चौहान हा कारसह पळून गेला होता. या अपघातामध्ये निर्मला गावित यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

SCROLL FOR NEXT