Niraj Singh Rathore Fraud BJP MLA
Niraj Singh Rathore Fraud BJP MLA  saam tv
महाराष्ट्र

BJP MLA Fraud: भाजप आमदारांना गंडवणारा आरोपी प्रत्यक्षात बारावी नापास! तिहार जेलचीही खाल्लीये हवा

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Niraj Singh Rathore Fraud BJP MLA : भाजप आमदारांना मंत्रिपदाचं आमिष दाखवून कोट्यवधींना गंडवणारा आरोपी बारावी फेल आणि तिहार जेल रिटर्न असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी निरज सिंग राठोड याचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला असून केला त्याच्या चौकशीतून आणि मोबाईलमधील माहितीवरून देशातील आणखी काही आमदारांनी नावं पुढे येण्याची शक्यता आहे. निरजसिंह राठोडला अहमदाबादच्या मोरबी येथून नागपूरमध्ये आणले आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा खोटा आवाज काढून भाजप आमदारांकडे मंत्रिपदासाठी पैशांची मागणारा आरोपी निरज सिंग राठोड हा बारावी फेल आणि तिहार जेल रिटर्न आहे. आरोपी निरजवर यापूर्वी दिल्लीत फसवणुकी अनेक गुन्हे दाखल आहेत. निरज सिंग राठोडची रवानगी पाच दिवसांसाठी पोलीस कोठडी करण्यात आली आहे. पोलीस तपासात आणखी काही आमदारांची नावं पुढे येण्याची शक्यता आहे.

जे पी नड्डा यांचा सहायक असल्याचा बनाव करणाऱ्या निरज सिंग राठोडची पोलीस कसून चौकशी करत आहेत. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगून मंत्रीपद मिळवून देण्यासाठी राज्यातील सहा आमदारांकडे त्याने पैशाची मागणी केली होती. नागपुरातील भाजपचे आमदार विकास कुंभारे, भाजप आमदार टेकचंद सावरकर यांना निरजचा फोन आला होता. (Latest Political News)

राज्यात मंत्रीमंडळ विस्तार होणार असून मंत्रिपद हवे असेल तर पक्षनिधी म्हणून पावणेदोन कोटी रुपयांची त्याने आमदारांकडे केली होती. आमदार कुंभारे यांनी पोलीसात तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण समोर आलं. यानतंर पोलिसांनी अहमदाबादच्या मोरबी येथून निरज सिंह राठोड याला ताब्यात घेतलं. त्याची चौकसी केली असता आरोपीने देशभरातील अनेक आमदारांकडे पैसे मागीतल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amrita Pandey: प्रसिद्ध अभिनेत्री फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली; मृत्यूच्या काही तास आधीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचा दारूण पराभव; कोलकताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा 'या' कारला आहे मागणी

SCROLL FOR NEXT