Nashik Niphad Winter Alert News Saam Tv
महाराष्ट्र

Nashik News: कडाक्याच्या थंडीमुळे २२ वर्षाच्या तरूणाचा मृत्यू, नाशिकमध्ये हळहळ

Nashik Niphad Winter Alert News : नाशिकच्या निफाड तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. तापमान ६ अंशांखाली गेल्याने गारठ्याचा धोका वाढला असून नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Alisha Khedekar

  • निफाडमध्ये कडाक्याच्या थंडीमुळे २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू

  • शवविच्छेदन अहवालानुसार अतिथंडीमुळे हृदयविकाराचा झटका

  • निफाडमध्ये तापमान ६ अंश सेल्सिअसच्या खाली

  • वाढत्या थंडीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका

Niphad Youth dies due to cold weather In Nashik राज्यात थंडीचं तापमान हळूहळू वाढताना पाहायला मिळत आहे. उत्तरेकडील वारे वेगाने वाहत असल्याने तापमानात घट होत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पारा १० अंशाखाली गेला असून हा गारठा नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. अशीच एक घटना नाशिकच्या निफाड मधून समोर आली आहे. वाढत्या गारठ्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत तरुणाचे नाव समीर दौलत सोनवणे (Samir Sonawane) (वर्षे २२) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना देवगाव येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाजवळ शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाजवळ समीर दौलत सोनवणे हा तरुण मृत अवस्थतेत आढळून आला. गावातील पोलीस पाटील सुनील बोचरे यांनी लासलगाव पोलिसांना तत्काळ घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी तात्काळ धाव घेत तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार अतिथंडीमुळे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने तरुणाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेषतः रात्रीच्या वेळी काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

दरम्यान निफाड तालुक्यात शुक्रवारी निफाड गहू कृषी संशोधन केंद्रात ६.१ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाल्याने निफाडकर कडाक्याच्या थंडीने गारठले आहेत. यंदा गुरुवारी प्रथमच ५.९ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली होती. या वाढत्या थंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio New Plan: jioची धमाकेदार ऑफर! आता 28 नाही तर 36 दिवसांचा रिचार्ज, सोबत दिवसाला 2GB डेटा अन् बरच काही

Hair Care : केसांना मोकळे सोडून झोपावे की बांधून? काय योग्य? जाणून घ्या...

'मार्व्हल'स्टाईल कॅम्पेनने भाजपची मुंबईच्या प्रचारात आघाडी, विरोधक राहिले मागे

Bigg Boss Marathi 6 : "तोंड शेणात घाल..."; बिग बॉसच्या पहिल्याच दिवशी तन्वी कोलते अन् रुचिता जामदार यांच्यात राडा; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : नाशिक पुणे महामार्ग ठप्प! रेल्वेसाठी रास्ता रोको

SCROLL FOR NEXT