Sangli, Miraj, Mahisal, Sangli Breaking News, Doctor, Teacher saam tv
महाराष्ट्र

सांगली : डॉक्टर, शिक्षकबंधूसह कुटुंबातील ९ जणांची आत्महत्या

या घटनेचा तपास सुरु असून लवकरच सविस्तर तपशील दिला जाईल अशी माहिती पाेलीसांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

विजय पाटील

सांगली : सांगली (sangli) जिल्ह्यातील मिरज (miraj) तालुक्यातील म्हैसाळ (mhaisal) येथे एकाच कुटुंबातील ९ जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती समजताच पोलीस (police) घटनास्थळी पाेहचले. या घटनेची माहिती समजताच जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी देखील घटनास्थळी भेट देत तपासाची चक्रे फिरवली. (mhaisal latest marathi news)

नरवाड रोड अंबिका नगर चौंडजे मळा आणि हॉटेल राजधानी कॉर्नर या दोन ठिकाणी एकाच कुटुंबातील नऊ जणांचे घरात मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पशु वैद्यकीय डॉक्टर डॉ. माणिक यल्लप्पा वनमोरे (dr manik vanmore) आणि त्यांचा शिक्षक भाऊ पोपट यल्लप्पा वनमोरे (popat vanmore) या दोघांच्या आई, पत्नी आणि मुलांचा मृतांत समावेश आहे. पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार वनमोरे यांच्या कुटुंबाने आर्थिक कारणावरून विष प्राशन करून आत्महत्या केली असावी अशी शक्यता आहे. या घटनेचा तपास सुरु आहे. घटनास्थळी स्थानिकांची माेठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे.

पाेलीसांनी सांगितले डॉ. माणिक यल्लप्पा वनमोरे, पत्नी रेखा माणिक वनमोरे , आई आक्काताई यल्लप्पा वनमोरे, मुलगी प्रतिमा माणिक वनमोरे , मुलगा आदित्य माणिक वनमोरे, पुतण्या शुभम पोपट वनमोरे तसेच राजधानी हॉटेल जवळ दुसऱ्या घरात डॉ माणिक यांचा भाऊ पोपट यल्लप्पा वनमोरे, संगीता पोपट वनमोरे, मुलगी अर्चना पोपट वनमोरे यांचे मृतदेह घरात आढळून आले आहेत.

दरम्यान घटनास्थळी पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम, उपविभागीय पोलीस अधीक्षक अशोक वीरकर, पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेंदरे हे घटनास्थळी तसेच परिसरात चाैकशी करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वर्ध्यात वीज पडून दोन ठार, एक गंभीर

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT