मुख्यमंत्री CM उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणे, केंद्रीय मंत्री Union Minister नारायण राणे Narayan Rane यांना चांगलेच भोवले आहे. नाशिकमध्ये Nashik नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी पोलिसांत Police नारायण राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर महाड आणि पुण्यात देखील नारायण राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हे देखील पहा -
नारायण राणे यांच्या विरोधामध्ये कलम ५००, ५०२, ५०५, १५३ (अ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नारायण राणेंवर नाशिक, महाड येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. राणेंच्या विधानाने समाजात द्वेष, तेढ निर्माण होऊ शकतो, कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी आशयाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मंत्रालयात स्वातंत्र्यदिनाचा दाखला देत 'मी असतो तर कानाखाली चढवली असती', असे आक्षेपार्ह वक्तव्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले आहे.
दरम्यान, यावर आता माजी खासदार निलेश राणे Nilesh Rane यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. कुठेतरी बॅनर Banner लावा आणि मीडिया वर हात छाटण्याची वार्ता करून शिवसेनेला वाटत असेल की आम्हाला फरक पडतो तर त्यानी लक्षात घ्यावं आम्हाला काडीभर फरक पडत नाही. खऱ्या आईचं दूध पियाला असाल तर समोर या आणि दोन हात करा, तुमची औकात दाखवून देऊ असे खळबळजनक ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे narayan rane यांनी मुख्यमंत्री CM उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्याविरोधामध्ये केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राणे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे मुंबई Mumbai आणि कोकणामध्ये Konkan तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. नारायण राणे विरुद्ध शिवसेना ShivSena हा संघर्ष आता आणखीनच पेटण्याची शक्यता आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.