Nilesh Lanke vs sujay vikeh  Saam tv
महाराष्ट्र

Video : इंग्रजी भाषेवरून लंके आणि विखे यांच्यात पुन्हा जुंपली; ठाकरेंच्या भेटीनंतर नगरच्या खासदारांनी दाखवला मराठी बाणा

Nilesh Lanke vs Sujay Vikhe : इंग्रजी भाषेवरून निलेश लंके आणि सुजय विखे यांच्यात पुन्हा जुंपली आहे. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर निलेश लंके यांनी सुजय विखे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Vishal Gangurde

संजय गडदे,साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांचा दारुण पराभव केला. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, सुजय विखेंनी निलेश लंके यांना इंग्रजी बोलून दाखवण्याचं आव्हान केलं होतं. त्यानंतर निवडणूक जिंकताच निलेश लंके यांनी इंग्रजी भाषेवरून सुजय विखे यांना प्रत्युत्तर दिलं होतं. आता पुन्हा एकदा निलेश लंके यांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर इंग्रजीच्या भाषेवरून सुजय विखे यांना सणसणीत टोला लगावला आहे.

निलेश लंके हे मुंबई दौऱ्यावर आहेत. या मुंबई दौऱ्यादरम्यान, निलेश लंके यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर निलेश लंके यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, 'बाळासाहेब ठाकरे यांचं एक वाक्य आठवतं. ८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण... बाळासाहेब ठाकरेंची प्रेरणा घेऊन राजकारणाचा प्रवास सुरु केला होता. शिवसेनेत शाखाप्रमुख, गटप्रमुख, तालुकाप्रमुख असे पद भूषवलं. मी खासदार झाल्याने उद्धव ठाकरेंनाही आनंद झाला. विधानसभा निवडणुकीत नगरच्या १२ पैकी १२ जागा निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. या संदर्भात ठाकरेंशी देखील बोललो आहे'.

'महाविकास आघाडीच्या एवढ्या जागा निवडून आल्या. त्याचा त्यांना खूप आनंद झाला आहे. उद्धव ठाकरेंना व्यग्र कामांमुळे नगरमध्ये प्रचाराला येता आलं नाही. मात्र, आदित्य ठाकरे आणि इतर नेत्यांनी माझा प्रचार केला. विधानसभा किंवा मेळावा होईल, त्यावेळी पहिला मेळावा नगरमध्ये घेऊ असं त्यांनी मला सांगितलं आहे, असे लंके म्हणाले.

भाजप नेते सुजय विखे यांच्या निवडणूक आयोगातील तक्रारीवर बोलताना लंके म्हणाले, 'काही लोकांना त्यांचा पराभव मान्य झालेल नाही. त्यामुळे असे रिकामे उद्योग करत असतात. त्यांना जे काम करायचे ते करू द्या'. तर इंग्रजी भाषेवरून बोलताना लंके म्हणाले, 'राज्यातील सर्वसामान्यांना कळणारी भाषा मराठी आहे. त्यामुळे मी त्यातूनच माझे काम करतो'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT