Nilanga St Bus Hits Two School Buses In Latur; Driver's Presence Of Mind Averts Major Tragedy saam tv
महाराष्ट्र

Latur Bus Accident: मनोरुग्ण प्रवाशानं बसचं स्टेअरिंग ओढलं; दोन स्कूल बस धडाधड धडकल्या

Latur Bus Accident: लातूर-औसा मार्गावर एका प्रवाशाने कथितरीत्या स्टिअरिंग ओढल्यामुळे निलंगा आगाराची एसटी बस दोन शालेय बसेसना धडकली. या घटनेत अनेक प्रवासी जखमी झाले, परंतु चालकाने तत्परतेने केलेल्या कृतीमुळे मोठी दुर्घटना टळली.

Bharat Jadhav

  • निलंगा आगाराची बस दोन स्कूलबसवर धडकली

  • प्रवाशाने स्टेअरिंग ओढल्याने बसचा अपघात

  • चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

संदीप भोसले, साम प्रतिनिधी

लातूर–औसा रोडवरील पेठ परिसरात सोमवारी दुपारी एक धक्कादायक अपघात झाला. निलंगा आगाराची एसटी बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन स्कूलबसवर जाऊन धडकली. या अपघातात बसमधील अनेक प्रवासी जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालकाने प्रसंगावधान राखल्यानं बस मोकळ्या जागेत नेली आणि संभाव्य मोठी जीवितहानी टळली. अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

हाती आलेल्या माहितीनुसार, निलंगा आगाराची एमएच-२० बीएल-२५७० क्रमांकाची एसटी बस दुपारी सुमारे दीड वाजता लातूर बसस्थानकातून औसाकडे जात होती. पेठ परिसरातील किड्स शाळेजवळ बस पोहोचताच बसमधील एका प्रवाशाने अचानक चालकाच्या पाठीमागे जाऊन स्टेअरिंग ओढली. त्यामुळे बस वळवली आणि रस्त्याच्या बाजुला असलेल्या स्कूल बसला धडकली, असा आरोप प्रत्यक्षदर्शी व बसमधील प्रवाशांनी केला आहे.

अचनाक स्टेअरिंग ओढल्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या कडेला विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या दोन स्कूलबसवर जाऊन धडकली. या अपघातात एमएच-२६ एन-९१४३ व एमएच-२५ टी-०५८६ क्रमांकाच्या दोन्ही स्कूलबसचे मोठे नुकसान झाले. एसटी बसच्या पुढील भागाचेही मोठे नुकसान झालंय. ही घटना घडताच बसमधील प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले. त्यांना तातडीने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

प्रत्यक्षदर्शींच्या मते, बसने दोन स्कूलबसना धडक दिल्यानंतरही चालकाने धैर्य न गमावता बस सुमारे शंभर फूट पुढे मोकळ्या जागेत नेऊन थांबविली. त्यामुळे बस अनियंत्रित होऊन आणखी मोठा अपघात होण्याची शक्यता टळली. त्या वेळी स्कूलबस विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत उभ्या होत्या. सुदैवाने विद्यार्थ्यांची मोठी गर्दी नसल्याने मोठी जीवितहानी टळली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धुळे सोलापूर महामार्गवर पुन्हा मराठा आंदोलकांनी रस्ता अडवला

Mumbai Water Update: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! पाण्याचं टेन्शन मिटलं! तानसा तलावात ९८.३७ टक्के पाणीसाठा, इतर तलावांमध्ये किती आहे पाणीसाठा?

Kitchen Tips : वारंवार धुवूनही किचनचा कपडा स्वच्छ होत नाही? या ट्रिक्स नक्की ट्राय करा

Mumbai Fort : किल्ला, समुद्र अन् हजारो फ्लेमिंगो; मुंबईतील 'या' ठिकाणाचं सौंदर्य मन मोहून टाकतं!

Diabetes Diet: डायबिटीजच्या रुग्णांसाठी 'ही' भाजी ठरू शकते फायदेशीर; ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी नक्की खा

SCROLL FOR NEXT