कोकेन साम टीव्ही
महाराष्ट्र

कोंढव्यात कोकेन विकताना नायजेरीन जाळ्यात

पुणे पोलिसांच्या नार्कोटिक विभागाने कोंढवा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील उंड्री परिसरातून कोकेन विक्री करणाऱ्या एका नायजेरियन तस्कराला ताब्यात घेतले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे पोलिसांच्या नार्कोटिक विभागाने (Narcotics Control Bureau) कोंढवा पोलिस स्टेशनच्या (Kondhava Police Station) हद्दीतील उंड्री परिसरातून कोकेन विक्री करणाऱ्या एका नायजेरियन तस्कराला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून तब्बल सव्वा पाच लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ओलमाईड क्रिस्तोफर कायोदे (वय 42) असे अटक केलेल्या नायजेरियन व्यक्तीचे नाव आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nigerian man arrested for selling cocaine in Kondhwa)

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, शहरात सुरू असणाऱ्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने अमली पदार्थ विरोधी पथकाचे कर्मचारी उन्द्री परिसरात गस्त घालत होते. पथकातील कर्मचारी योगेश मोहिते यांना माहिती मिळाली की उंड्री परिसरात एक नायजेरियन व्यक्ती अंमली पदार्थ विकतो. त्यानंतर पोलिसांनी भक्ती प्राईड सोसायटीत सापळा रचून आरोपीला अटक केली. यावेळी त्याच्याकडून 5 लाख 29 हजार 900 रुपयांचे 52 ग्रॅम 980 मिली कोकेन जप्त केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugarcane Juice: उसाच्या रसाचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Updates: नाशिक जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

Railtel Recruitment: सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी;अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु; पात्रता काय? जाणून घ्या

गौरी खानला शालिनी पासीबद्दल जाणवते चिंता, काय आहे नेमक कारण?

SCROLL FOR NEXT