नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणाचं एमआयएम कनेक्शन समोर आलंय. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार संशयित आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. तिला कोर्टात हजर केलं असता तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. धक्कादायक बाब म्हणजे 25 मार्च पासून फरार असलेल्या निदा खानला MIM चे नगरसेवक मतीन पटेलांनी आपल्या घरात आसरा दिला होता. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा नोंदवत पटेलांना सहआरोपी केले आहे.
दरम्यान निदा खानच्या अटकेवरून पालकमंत्री संजय शिरसाट यांनी MIMवर गंभीर आरोप केलात.. कॉर्पोरेट जिहाद'चा मास्टरमाइंड संभाजीनगरात आहे. इम्तियाज जलील यांची चौकशी करा, असं शिरसाटांनी म्हटलंय. तर शिरसाटांनी केलेले आरोप जलील यांनी फेटाळलेत. तर चौकशीसाठी तयारी असल्याच जलील यांनी म्हटलंय.
दुसरीकडे भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही याप्रकरणी एमआयएमच्या चौकशीची मागणी केली आहे. गर्भवती असल्याचं कारण देत निदा खानने अटकपूर्व जामिनासाठी नाशिक कोर्टात अर्ज केला होता. मात्र कोर्टाने जामिन अर्ज फेटाळला होता. राज्यभरात तिचा शोध सुरु होता. महिला लैंगिक अत्याचारातील आरोपींना मदतीसह धर्मांतरासाठी निदा खान महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचा आरोप आहे. या प्रकरणात विदेशी निधीसह आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचाही संशय पोलिसांना आहे. त्याशिवाय कॉर्पोरेट लव्ह जिहाद प्रकरणात एमआयएमच्या नेत्यांची सक्रीय भूमिका होती का? त्यादृष्टीने एसआयटीच्या तपासात काय माहिती समोर येते ते पाहणं महत्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.