Amravati Umesh Kolhe Case NIA News अमर घटारे
महाराष्ट्र

उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणी आरोपींच्या घरासह १७ ठिकाणी NIA ची छापेमारी

NIA ने एकूण १७ ठिकाणी छापे मारले असून या ठिकाणाहून मोबाईल, सिम कार्ड, मेमरीकार्ड या सह अनेक वस्तू जप्त केल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमर घटारे -

अमरावती: उमेश कोल्हे (Umesh Kolhe) हत्या प्रकरणाचा संपुर्ण तपास NIA ने संपूर्ण आपल्याकडे घेतला आहे. याच हत्या प्रकरणाचा तपास करत असताना आज दुपारी एक वाजताच्या सुमारास अटक करण्यात आलेल्या ७ आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना मुंबईला रवाना करण्यात आलं आहे.

दरम्यान, NIA च्या टीमने आरोपींच्या घरासह ते ज्या ठिकाणी वास्तव्यास होते अशा एकूण सतरा ठिकाणी छापेमारी केली. छापेमारीत मोबाईल, सिम कार्ड, मेमरीकार्ड या सह अनेक वस्तू NIA च्या टीमने जप्त केल्या आहेत.

पाहा व्हिडीओ -

नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांचं समर्थन केलं म्हणून अमरावतीमधील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची २१ जून रोजी हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी आतापर्यंत ९ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आज NIA ने अमरावती (Amravati) शहरातील अरोपींच्या घरासह अन्य १७ जागी छापेमारी केली असता या ठिकाणांवरून अनेक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

काय आहे प्रकरण ?

भाजपच्या (BJP) प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषितांविरोधात एका वृत्त वाहिनीवर आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचे पडसाद जगभरात उमटले होते. काही लोकांनी शर्मा यांचा विरोध केला तर काहींनी समर्थन केलं. तर भाजपने देखील नुपूर शर्मा यांना निलंबित केलं आहे.

अमरावतीमधील उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट शेअर केली होती. पोस्ट शेअर केल्याप्रकरणी कोल्हे यांना धमक्या येऊ लागल्या. त्यानंतर २१ जून रोजी कोल्हे यांची हत्या करण्यात आली. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान शेख याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. इरफान शेख हा रहबर नावाची एक एनजीओ चालवतो.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Prepaid Plan: खुशखबर! 200GB डेटा आणि 90 दिवसांची वैधता अन्...; Jio युजर्ससाठी 'ही' खास ऑफर माहितीये का?

Accident News : कल्याणमध्ये अपघाताचा थरार! रिंग रोड बनला स्टंटबाजांचा अड्डा, भरधाव कार व्यवसायिकाला धडकली

Maharashtra Live News Update: संत गाडगे महाराज यांच्या 150 व्या जयंती दिनी त्यांच्या पुतळ्याचे पालिका आवारात करण्यात आले भूमिपूजन

करोडपती बनायचंय मग PPF मध्ये करा गुंतवणूक; आयुष्यभर दरमहा मिळतील 61,500 पेन्शन

Viral Video: जगातील सर्वात सुंदर व्हिडिओ, मुलाने पहिल्यांदा विमानात बसवलं; माऊलीच्या डोळ्यांतून वाहू लागले सुखाचे अश्रू

SCROLL FOR NEXT