सातारा : नदी पात्रात वाढ़ झाल्यामुळे सातारा, कराड, कोल्हापूरला जाणाऱ्या मालवाहतूकची सर्व वाहने शिरवळ (ता. खंडाळा) येथे थांबाविण्यात येत आहे. वाहतुकादारांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन सातारा पाेलिस दलाने केले आहे. (nh4-road-closed-pune-kolhapur-sangli-karad-rain-update-sml80)
सद्यस्थितीत सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात अतिवृष्टी होत आहे. सर्व धरणातून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे.
सातारा जिल्ह्यात सकाळी 10 वाजेपर्यंत सरासरी एकूण 60.7 मिली मीटर पाऊस पडला असून आतापर्यंत सरासरी 266 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. पावासमुळे अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. क-हाड चिपळुण महामार्गावर अनेक ठिकाणी माती साचल्याने हा महामार्ग देखील वाहतुकीसाठी बंद Breaking News ठेवण्यात आला आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी kognali फाट्यावरून वाहतूक परत महाराष्ट्रात पाठविण्यात आली आहे.
नागरिकांनी अशी घ्यावी काळजी
कोणत्याही परिस्थितीत पुराच्या पाण्यात प्रवेश करू नका.
नदीपात्राच्या कडेला अथवा धोक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हा.
मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका.
जुन्या मोडकळीस आलेल्या घरात/इमारतीत आश्रय घेऊ नका.
नदी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नका.
अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका.
धोकादायक ठिकाणी अथवा दरड कोसळणाऱ्या ठिकाणी थांबू नका.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.