Mhasrul Police Station, Nashik तरबेज शेख
महाराष्ट्र

'उद्या या माझ्या मयतीला...' पतीला व्हॉट्सॲप मेसेज करत नवविवाहितेची आत्महत्या!

नवीन ऑफिस घेण्यासाठी माहेरून वीस लाख रुपये आणावेत यासाठी पती व सासूने वारंवार मानसिक व शारीरिक छळ करून त्रास देत होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तरबेज शेख

पंचवटी : नवविवाहितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमधून समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन ऑफिस घेण्यासाठी माहेरून वीस लाख रुपये आणावेत यासाठी पती व सासूने वारंवार मानसिक व शारीरिक छळ करून त्रास देत होते. या प्रकरणी जळगाव जिल्ह्यात राहणाऱ्या पती, सासूवर नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात विवाहितेला शारीरिक, मानसिक छळ करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Crime News)

नाशिकच्या (Nashik) म्हसरुळ पोलसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विवाहितेचे वडील ज्ञानेश्वर शेना धनगर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मृत विवाहितेचा पती धनंजय संतोष धनगर आणि सासू संगीता संतोष धनगर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वीच मखमलाबाद रोडवर गोकूळनगरला राहणाऱ्या श्रद्धा धनंजय धनगर हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. मृत श्रद्धा व जळगावचा संशयित आरोपी धनंजय धनगर या दोघांचा पाच महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर काही दिवसांनी पती व सासू यांनी नवीन ऑफिस घेण्यासाठी माहेरून २० लाख रुपये आणावे, अशी मागणी करत होते. पैसे आणत नसल्याने श्रद्धा यांचा शारीरिक व मानसिक छळ (Domestic Violence) करून तिला मारहाण करीत उपाशी ठेवले.

हे देखील पाहा-

तसेच, चॅटमध्ये श्रद्धाने उद्या माझ्या मयतीला या असा मेसेज केल्यास त्यावर हास्यास्पद अशी इमोजी पाठविली होती. अशा प्रकारे वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून श्रद्धा धनगर माहेरी निघून गेली होती. त्यावेळी झालेल्या प्रकाराबाबत तिने कुटुंबीयांना माहितीही होती. अखेर दोन दिवसांपूर्वी वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी म्हसरुळ पोलिसांनी पती धनंजय धनगर याला अटक केली असून म्हसरुळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एस. आय. चतुर पुढील तपास करत आहे.

श्रद्धा धनगर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pav Bhaji: घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल पावभाजी कशी बनवायची?

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Madhuri Dixit: धकधक गर्लचं लाजवाब सौंदर्य, फोटो पाहताच घायाळ व्हाल

Sonu Nigam : 'ये दिल दीवाना...' रस्त्यावर थांबून छोट्या चाहत्यासोबत सोनू निगमनं गायलं गाणं, पाहा VIDEO

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

SCROLL FOR NEXT